सुखदुःखांचा दुवा निवृत्त होतोय........! श्री. बबन जंगम ,पोष्टमन....!!



म्हसळा तालुका पोस्ट कार्यालयातील श्री.बबन जंगम हे येत्या 30 मे ला पोस्ट खात्यात पोस्टमन म्हणून यशस्वी सेवा करून वयाच्या 60व्या वर्षी सेवा निवृत्त होत आहेत.
प्रसिद्ध लेखक अशोक पाटोळे यांच्या आई retired होतेय.......! या नाटकात ज्याप्रकारे आई संदर्भात अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न करता करता आईविषयी जिथे संकल्पना कमी पडतात तसंच काय....? श्री.बबन जंगम हे आपल्या नजरेसमोर अनेक वेळा आले आहेत.खाकी वर्दीत खांद्यावरील बॅगेत अनेकांचे सुखं दुःख कित्येक वर्ष आपणापर्यंत हसत मुखाने पोहचवीत आले.धर्म जात पंथ याच्याही पलिकडे जाऊन सगळ्यांच्या दुःखावर हळुवार शब्दाने फुंकर घालणारे निरपेक्ष व्यक्तिमत्व. फक्त कमावणे,कुटुंब सांभाळणे एवढेच नव्हे तर यांनी समाज,गाव,तालुका,रायगड जिल्यातील संपूर्ण टपाल कार्यालयात आपल्या निर्मळ, सोज्वळ आणि मवाळ प्रतिभेचा ठसा उमटवला.या व्यक्तिमत्वाने पंचायत समिती म्हसळा,तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन,मोहल्ला,वाड्या, वस्ती तसेच शाळा कॉलेजसारख्या अनेक लोकांच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केले.पत्रकार ,राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मंडळी तसेच टपाल कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्र्या कडून अनेक वेळा कौतुकास पात्र ठरले आहेत.असा बहुचर्चित चेहरा निवृत्त होत असताना ते आपल्या यशस्वी सेवेच्या कार्यकाळात आपल्या सहकाऱ्यांसह मा.श्री.श्रीकांत म्हेत्रे(पोस्टमास्तर म्हसळा), श्री.एन्. डी. पाटील(माजी पोस्टमास्तर), श्री.संजय शिंदे ,अरुणदादा जंगम व तालुक्यातील सर्व ब्रँच पोस्टमास्तर, डाकसेवक तसेच ऑफिसमधील सर्व सहकारी ऋण व्यक्त करतात.
असा बहुआयामी चेहरा निवृत्त होताना कदाचित हे पत्र नव्हे ! तर भावभावनेची रिक्त जागा सहकाराचं, कर्तव्याचं ,निष्ठतेचं, आपुलकी प्रेमाचं नात निवृत्त होतोय .तद्नंतर सुद्धा हे सेवेचं व्रत नित्यनिरंतर जपत राहतील. तालुक्यातील अनेक नामांकित यशस्वी लोकांच्या इतिहास यादीत पोस्टमन बबन जंगम हे नाव अग्रगण्य राहील.त्यांच्या यशस्वी कारकीर्द सेवेला म्हसळा लाईव्ह चा सलाम।।।।

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा