म्हसळा तालुक्यात दोन कोरोनाबाधितांची वाढ १ मृत ३ बाधीत

फोटो. शासनाने गांभीर्य न घेतल्याने कोरोंटाईन शिक्के मारूनही म्हसळा बाजारात बिनधास्त फिरताना चाकरमाने


( म्हसळा प्रतिनिधी )
राज्यांत कोरोना बाधितांची संख्या वाढतअसताना रायगड जिह्यांतील म्हसळा तालुक्यात सुध्दा कोरोना बाधीता वाढ होत आहे. आताच आलेल्या माहितीनुसार म्हसळा तालुक्यातील कोळे ग्रामपंचायतीतील तळवडे येथील५९ वर्षीय महीला व पाभरे ग्रामपंचायत हद्दीतील गायरोणे गावातील ४५ वर्षीय पुरुष हे दोघेही रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आल्याचे समजते. आत्तापर्यंत म्हसळा तालुक्यात कोरोना पॉझीटीव्ह असणाऱ्यांची संख्या ४ झाली आहे, त्यातील एक मृत आहे.म्हसळा तालुक्यात मे महीन्याच्या सुरवाती पासून आजपर्यंत सुमारे १३,४०० चाकरमाने आले असून त्यातील बहुतांश मंडळी कॉरंटाईन झाली होती. तळवडे ग्रामपंचायतीचे गाव वाड्यांवर ३९६ तर पाभरे ग्रामपंचायतीचे हद्दींत ५५६ स्थलांतरीत आले आहेत कॉरंटाईनचे वेळी अनेक जण आपल्या गावांत व शहरांत मुनमुराद फिरताना दिसत असत. या सर्व परिस्थितीत इन्सीडेंट कमांडर सह, आरोग्य, ग्राम विकास, नगरपंचायत, पोलीस प्रशासन यांच्यात अनेक वेळा सुसूत्रता दिसण्यात आली नाही अशी टीका होत आहे. आजून काही दिवसांत तालुक्यात रुग्णांचे संखेत वाढ होण्याची शक्यता आहे. नागरीकानी महत्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, आवश्यक ते शारिरीक अंतर ठेवावे, गर्दी करू नये , .मास्कचा वापर करावा, दूकानातील प्रत्येक ग्राहकांमध्ये सहा फूट अंतर असणे आवश्यक राहिल. या व्यतिरिक्त एका दूकानात ५ पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहणार नाही. याची जबाबदारी संबंधित सर्व दूकानदार व ग्राहकानी घेणे बंधनकारक आहे. असे शासना मार्फत सांगण्यात येते.


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा