महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपाचे म्हसळ्यात निषेध आंदोलन.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
मुंबईसह संपूर्ण राज्यात मोठ्या शहरात करोना रोगाने थैमान घातले आहे . या रोगावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपा म्हसळाचे अध्यक्ष प्रकाश रायकर शहर अध्यक्ष मंगेश मुंडे तालुका उपाध्यक्ष अनिल टिंगरे यांच्या नेतृत्वा खाली भाजप म्हसळा कार्यालया समोर ...मेरा आंगन रनांगन..राज्य सरकार कोरोना संकट हाताळण्यात अयशस्वी झाल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करत काळे मास्क लावून शासनाच्या विरोधात फलक घेऊन म्हसळा भाजपाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप कार्यालया समोर आंदोलन केले. यावेळी तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यानी राज्य शासनावर कडक टीका करताना शासनाला मोठया शहरांपासून खेडयापर्यंत कोरोना कोविड-19 मध्ये नियोजनात अपयश येत आसल्याचे सांगून आघाडी सरकार विरोधात भाजपामे म्हसळयात निषेध आंदोलन कार्यकर्त्यांनी केले सोशल डिस्टन्स व संचारबंदी नियमांच्या अधीन राहून कार्यकर्त्यांनी आघाडी सरकार विरोधात रोष व्यक्त केला.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा