रायगड प्रतींनिधी
लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात आज दोन महिन्यानंतर एसटी रस्त्यावर उवतरली. पहिल्याच दिवशी या लालपरीलाही प्रवाशांनी अल्प प्रतिसाद दिला. नियोजीत फेर्यांपैकी केवळ 70 फेर्याच चालवण्यात आल्याची माहीती विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के अनघा बारटक्के यांनी दिली.
जिल्हयातील अलिबाग आगारातून 36, महाड आगारातून 44, पेण आगारातून 46, कर्जत आगारातून 14, रोहा आगारातून 68, मुरुड आगारातून 24, माणगाव आगारातून 28 फेर्यांचे नियोजन करण्यात आले होते. 22 मे पासून एसटी बस सेवा सुरु करण्यात आली.
अलिबाग आगारातून सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास अलिबाग पेण, मुरुड आगारातून मुरुड अलिबाग, पेण आगारातून दुपारी पेण - पाली, अशा बसेस सोडण्यात आल्या. पहिल्या दिवशी नियोजित फेर्यांपेक्षा फक्त सुमारे 22 टक्के म्हजेच 70 फेर्या सोडण्यात आल्या.
सामाजिक अंतर राखून प्रवाशांनी एसटीमध्ये बसणे. ज्येष्ठ नागरिक तसेच 10 वर्षाखालील मुलांना एसटी प्रवासाला बंदी करणे. बसमध्ये बसण्यापुर्वी मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधणे, तसेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे अशा अटी शर्तीवर एसटी बस सेवा सुरु करण्यात आली आहे.
إرسال تعليق