हरिहरेश्वर ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद


श्रीवर्धन : प्रतिनिधी
कोरोना या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर मधील हॉटेल व्यावसायिक , स्टॉलधारक , मंदिर संस्थान , पुरोहित मंडळ आणि अन्य सेवाभावी संस्था यांची एक सामूहिक बैठक नुकतीच बोलविण्यात आली होती . या बैठकीमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी ३१ मार्चपर्यंत हरिहरेश्वर पूर्ण बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले . या आवाहनाला सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन ३१ मार्चपर्यंत हरिहरेश्वर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हरिहरेश्वर ची तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असल्याने तेथे मरणोत्तर दिवसकार्य , अस्थीविसर्जन , दशक्रिया विधी व इतर कार्येही केली जातात . परंतु सभेत झालेल्या निर्णयानुसार सदरची कामेही ३१ मार्चपर्यंत पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहेत . ही बैठक बोलावण्यासाठी सरपंच अमित खोत यांनी पुढाकार घेतला होता . 

सहकार्याचे आवाहन
सरपंच खोत यांनी सर्वांना आवाहन केले आहे की , भाविकांसह सर्वांनीच या बंदला प्रतिसाद द्यावा. गावासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा