दिव्यांग बांधवाची सर्टिफिकेट व वैश्विक ओळखपत्रेकधी मिळणार?

दिव्यांग बांधवाची सर्टिफिकेट व वैश्विक ओळखपत्रे
कधी मिळणार? दिव्यांग हक्क सुविधां पासुन वंचित

तळा (किशोर पितळे)
राज्याचे अपंग कल्याण आयुक्त पुणे यांच्या आदेशा नुसार दिव्यांंग व्यक्ती अस्मिता अभियांना अंतर्गत अपंग व्यक्तीना वैश्विक (UDID) ओळखपत्र तालुका स्तरावर शिबीर २५ फेब्रुवारी १९ रोजी तळा पं स.वतीने प्रार्थमिकआरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आले होते.दिव्यांग बांधवांना जिल्हा रुग्णालयात किंवा उप जिल्हा रुग्णालयात जाणे शक्य होत नाहीत व सर्टीफिकेट विना तसेच शासनाच्या सुविधा पासून वंचित राहू नये.म्हणून भारत सरकारने अपंगांच्या कल्याणकारी अंपग हक्क अधिनियम २०१६ कायदा अंतर्गत११एप्रिल१७पासुनसंपूर्ण देशात लागू केला असुन त्याची अंमल बजावणी करणे बंधनकारक असल्याने तालुक्यातील दिव्यांगबांधवांची तपासणी केली गेली तसेच ज्यांच्या जवळ पुर्वीची आँँनलाईन ची जमा करून घेऊन त्यांना नवीन देण्यात येणार असल्याने ती जमा केली आहेत या सर्वांना वैश्विक(UDID)ओळखपत्र दिली जाणार आहेत.हे शिबिर होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला असून किती दिवसांनी मिळणार असा सवाल दिव्यांग बांधव करीत आहेत.सर्टीफिकेट प्रत्येक पंचायत समिती मार्फत दिली जातील असे समजते पंरतु सर्टिफिकेट नसल्याने सेवा सुविधापासून वंचित राहावे लागत आहे
या बाबतीत अनेक वेळा सिव्हिल हाँस्पिटल मध्ये संपर्क साधला असता जिल्ह्यातील ज्या तालुक्यातून कँम्प सुरुवात झाली त्याप्रमाणेच आपल्याला ती आँँनलाईन सर्टिफिकेट तयार करून दिली जातीलअसे सांगण्यात येते परंतु काही तालुक्यात वाटप देखील करण्यातआले मग इतर तालुक्यातील दिव्यांग बांधवांवर
अन्याय का? दर बुधवारी दिव्यांगाची तपासणी करून अगदी थोड्या अवधीत सर्टीफिकेट दिली जातात.मग
राज्य अंपग कल्याण आयुक्त यांनी दिलेल्याआदेशाला अधिकारीनी केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून येत आहे.दिव्यांग बांधव गेला असता उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत.सही करणारे आज डॉ. नाहीत एक आहेत तर दुसरे नाही अशी कारणे सांगितले जात आहे.पण जिथे दाम तिथे काम अशी रित चालू केली आहे असे समजते.त्यामुळे दिव्यांग बांधवात संताप व्यक्त केला जात आहे.तरी  पालक मंत्री महोदया यांनी व जिल्हाअंपग कल्याण अधिकारी यांनीत्वरित लक्ष घालावे अशी मागणी केली जातआहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा