तळा : प्रतिनिधी
सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केला असून ग्रामीण भागात तो पसरू नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच पाश्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शुक्रवारी तळा नगरपंचायतीत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला नगराध्यक्षा रेश्मा मुंढे , वैद्यकीय अधिकारी अमोल बिरवाडकर यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. रविवार , २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत जनता कर्फ्यू राखण्याचे आवाहन केले आहे . तळा बाजारपेठेत होत असलेली गर्दी लक्षात घेता रविवार , सोमवार आणि मंगळवार असे एकूण तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना व्हायरसबाबत उपाययोजना करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. नगरपंचायतीकडून नागरिकांना साबण वाटप करण्यात येणार आहेत नागरिकांनी तोंडाला मास्क न लावता रुमालाचा वापर करावा. तसेच मुंबई , पुण्यातून येत असलेल्या नागरिकांमध्ये जर का संशयित लक्षणे आढळून आल्यास त्वरित याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी असे आवाहन करण्यात आले.
إرسال تعليق