घरीच थांबा : करोना थांबवा: पंतप्रधानांच्या आवाहनाला श्रीवर्धन म्हसळ्यातून साथ.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील श्रीवर्धन, म्हसळा व दिघी सागरी पोलीस ठाण्यांतून सर्व नगरपंचायत, ग्रामपंचायत व गाव- वाडयांतून तालुका प्रशासनाने केलेल्या जनजागृती मुळे जनतेने जनता कर्फ्यूअंतर्गत (Janta Curfew) घराबाहेर पडण्याचे टाळले.श्रीवर्धन उपविभागाअंर्तगत ३ पोलीस स्टेशन हद्दीत नागरिकानी आपले व्यवहार पूर्णपणे बंद होते. व सर्वत्र शांतता होती असे श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब पवार यानी आमचे प्रतिनिधी ला सांगितले.दोनही तालुक्यातील नागरी प्रवासी वहातुक सांभाळणाऱ्या श्रीवर्धन डेपोतील एकही बस प्रवासी नसल्यामुळे बाहेरच पडली नाही असे श्रीवर्धन डेपोचे डेपो मॅनेजर जुनेद यानी सांगितले. श्रीवर्धन डेपोतून शिवशाही, निम आराम व लाल परी अशा २८ गाडया मुंबई, पुणे, सातारा, मीरज,आलिबाग,ठाणे, भिवंडी, नालासोपारा येथे जात असतात तर अन्य २७ गाडया ग्रामिण भागात सेवा देत असतात. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला स्वेच्छेने प्रतिसाद दिला, दोनही तालुक्यातील मिनीडोअर, रिक्षा व वडाप वहातुक दारानी आपली बंदची भूमिका उत्कृष्ट बजावली.
"जिल्हयांतील सर्व दुकाने, खासगी कार्यालये, आस्थापना शासनाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमधून दूधविक्री केंद्रे, जीवनावश्यक वस्तुविक्री दुकाने, किराणा दुकाने, बँका, औषधांची दुकाने वगळण्यात आली आहेत, आवश्यकता वाटल्यास आम्ही . भविष्यात जनता कफ्युचे पालन करू असे व्यापारी मंडळी , ग्रामस्थ यानी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा