प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूंची लागण होण्याच्या भीतीने शहरी भागातील नागरिक मोठ्याप्रमाणावर मास्क आणि सेनीटायजर चा वापर करताना दिसून येत आहेत वापर वाढल्यामुळे मास्कचा तुटवडा होऊन मास्कचे भाव आता गगनाला भिडले आहेत साधारण दहा ते वीस रुपयाला मिळणारे मास्क आता 30 ते 40 रुपये ला मिळू लागले आहेत आणि ही बाब सर्वसामान्यांना परवडणारी नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी , आणि कष्टकरी वर्गाला मास्क वापरने खर्चिक वाटत होती. सर्वसामान्यांची हीच अडचण लक्षात घेऊन खरसई येथली गारमेंट व्यावसायिक आणि समाजसेवक आदरणीय तुकाराम मांदाडकर, अनंत मांदाडकर, नारायण मांदाडकर आणि हरीश मांदाडकर यांनी स्वखर्चाने गावातील नागरिकांना 1500 मास्क मोफत उपलब्ध करून दिले. त्याबद्दल गावकऱ्यांनी मांदाडकर कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले.
إرسال تعليق