संपूर्ण श्रीवर्धन शहरासह तालुक्यात जनता कर्फ्युला नागरिकांचा उदंड प्रतिसाद ; सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त.


 विजय गिरी श्रीवर्धन
संपूर्ण श्रीवर्धन शहरासह संपूर्ण तालुक्यात देखील नागरिकांनी जनता कर्फ्युला उदंड प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले आहे. श्रीवर्धन शहरातील सर्व व्यवहार सकाळी सात वाजल्यापासून पूर्णपणे बंद आहेत. सर्व दुकाने, भाजीची दुकाने, मच्छी मार्केट त्याचप्रमाणे चिकन व मटण मार्केट देखील 100% बंद आहे. श्रीवर्धन परिवहन आगारातून सकाळी एकही बस मुंबई,पुणे किंवा मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी सुटलेली नाही. तसेच अनेक स्थानिक फेऱ्या देखील पूर्णपणे रद्द केलेल्या आहेत. शहरांमधील सहाआसनी रिक्षा,तीन आसनी रिक्षा त्याचप्रमाणे इतर खाजगी वाहने देखील रस्त्यावर अजिबात फिरताना दिसत नव्हती. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी सकाळी सात ते रात्री 9 असा जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन देशातील सर्व नागरिकांना केले होते. चीनमध्ये सुरू झालेली कोरोना वायरसची साथ भारतामध्ये देखील आल्यानंतर त्याच्यावरती कडक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक होते. कारण हा व्हायरस इतक्या झटकन नागरिकांमध्ये पसरतो याचे परिणाम आपण इटली आणि फ्रान्स यासारख्या देशांमध्ये तसेच आखाती देशांमध्ये पाहायला मिळाले आहेत. संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या वायरस ने भारतात देखील आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ज्या पाश्चिमात्य देशातील मोठ्या नेत्यांना देखील सुचले नाही ते आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचले आणि ते प्रत्यक्ष अंमलात देखील आणून दाखवले आहे. आपण 14 तास एकमेकांच्या संपर्कात आलो नाही तर या विषाणूंचा मोठ्या प्रमाणावर नाश होऊन ते मरून जातील ही संकल्पना ख-या अर्थाने आता देशवासीयांनमध्ये जगल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे जनता कर्फ्यु  लागु झाल्यानंतर लहान मुले देखील रस्त्यावरती खेळताना कुठेही पाहायला मिळाली नाहीत. जर सर्व नागरिकांनी असाच संयम दाखवला तर येणाऱ्या काही दिवसातच आपण कोरोना व्हायरसला भारतातून हद्दपार करू, असा विश्वास नागरिकांमध्ये मध्ये दिसून येतोय

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा