म्हसळा शहरानजीकची जानसई नदी म्हसळा करांसाठी ठरते वरदायीनी.


जानसईच्या बंधाऱ्यामुळे म्हसळा शहरातील भूगर्भातील पाणी पातळीत वाढ.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहर म्हणजे आता पाणी टंचाईचे व दूषीत पाण्याचे माहेरघर अशी जणू ओळख होत असते. त्याचे कारण घरात- लेच आहे.शहराला पाणी टंचाईने ग्रासले असुन सतत चार ते पाच वर्ष टंचाईची झळ भासत असतानाच शहरांतील नागरिक मात्र सहनशीलतेने गेली १० वर्ष पाभरा धरणातील पाण्याची वाट पहात आहेत.शहरांतील बहुतांश जनता पाणी टंचाईला  कंटाळली आहे. याच कालवधीत म्हसळा शहरा नजीकची" जानसई नदी "ही म्हसळा शहराचे पाणी टंचाईला पुढे ढकलण्यास मदत करते असे चित्र आहे.
" जानसई नदीचा उगम वांगणी देहेन परिसरातील (राखीव वनक्षेत्र). श्री काळभैरवनाथ मंदीराचे घनदाट देवरहाटीतून होतो, हि नदी ४०० मीटर उंची वरून येते.नदीची लांबी १३ कि.मी.आहे, नदीच्या मुख्य पात्रांत घोणसे, सावर, चिराठी, दुर्गवाडी (बैरागा नदी) या उपनदा मिळतात व वहन प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असतो" याच नदीवर म्हसळा नगरपंचायतीच्या माध्यमांतून सुमारे १ ते सव्वा लक्ष रुपये संपवून मातीचा कच्चा बंधारा बांधल्यामुळे म्हसळा शहरांतील नगरपंचायतीच्या व खाजगी विहीरींच्या पाणी पातळीत वाढ व विंधण विहीरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आसल्याचे दिसते.शहरांत नगरपंचायतीच्या ७ व खाजगी ६ विहीरी आहेत ,तर नगरपंचायतीच्या३विंधण विहीरी व खाजगी ६९ विंधण विहीरी आहेत. यामुळे शहरांतील नगर पंचायतीचे पाणी टंचाईवर थोडी बहुत उपाय योजना होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा