म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
युवकांचे प्रेरणास्थान, समाजभूषण सुरेश स्वामी जंगम यांच्या प्रेरणेने सुरू झालेला शिवजयंती उत्सव अतिशय उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. शिवजयंती निमित्त अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिवज्योत मशाल यात्रेचे किल्ले रायगड ते तोंडसुरे जंगम वाडी पर्यत जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर संपूर्ण गावातून भव्य दिव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान थोर, पुरुष महिला सर्वांनी सहभागी होऊन जय भवानी, जय शिवाजी अशा प्रेरणादायी घोषणा देऊन चैतन्य निर्माण करीत गावात शिवमय वातावरण तयार केले होते.
यावेळी अनेक मान्यवरांनी व्याख्यानातून शिवमय विचार मांडले.
शिवजयंती कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हसळा तालुका जंगम समज अध्यक्ष रामलिंग हरिलिंग जंगम व ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुधाकर जंगम, मालिकांत जंगम आणि प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदर्शन जंगम, ऋषिकेश जंगम, अमित जंगम, कल्पेश जंगम, सतीश जंगम, संदेश जंगम, हरिश्चंद्र जंगम, अनंत जंगम, अविनाश जंगम, अक्षय जंगम, अंकेत जंगम, नितीन जंगम यांसह अनेक कार्यकर्ते, शिवपार्वती महिला मंडळ, तरुण तरुणी व शिवप्रेमीनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
إرسال تعليق