तळा (किशोर पितळे)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तळा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना तळा शहर व तळा तालुका तर्फे १२ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती चे आयोजन करण्यात आले होते.बळीच्या
नाक्यावर त्या निमित्ताने शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना व श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजीत करण्यात आली होती दुपारी तळा शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांचीभव्यमिरवणूककाढण्यतआलीमिरवणुकीत सिहासनावर बसलेले शिवाजी महाराजाची हुबेहूब जिवंतप्रतिकृती विलास ठक्कर यांनी साकारली होती हे आकर्षण ठरले.जय भवानी, जय शिवाजी,शिवाजी महाराज की जय आशा घोषणांंनी दुमदुमून गेले होते.संपूर्ण शहर भगवेमय झाले होते लेझीम पथक, मी शिवभक्त ढोल ताशा पथक तळा, शिवकालीन मर्दानी,लाठीकाठीचे प्रदर्शन यामुळे ऐतिहासिक वातावरणात प्रत्यक्षात शिवशाही अवतरलीअसल्याचे दृश्य भासत होते.या मिरवणुकीत माजी जिल्हाप्रमुख रविमुंढे,नगराध्यक्षारेश्मामुंढे,उपनगराध्यक्षासायलीताई खातू,महीला संघटक उषा पवार,नम्रता पाडळकर शिवसेनेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका, तालुका प्रमुखप्रदूम्नठसाळ,उपतालूकाप्रमुखशरदसारगेशहरप्रमुखराकेशवडकेउपशहरप्रमुख नझीर पठाण, लिलाधर खातू,नमीत पाढंरकामे यांसह असंख्य शिवसैनिक,शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री शहरातील होळीच्या मैदानावर 'माझ्या देवाचं नाव गाजतय' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेहोते.याकार्यक्रमातील कलाकारांनी आपल्या कलेचे बहारदार सादरीकरण केले व या सांस्कृतिक कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेले सिनेअभिनेते व हास्य कलाकार जॉनी रावत यांनी आपल्या हास्य अभिनयाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
إرسال تعليق