"बेटी बचाव बेटी पढाओ ते सुकन्या समृद्धी योजना, मुलींचे शिक्षण ते आरोग्य जपण्यासाठी" म्हसळा ICDS सज्ज


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
सुशिक्षित अशा शहरी भागासह ग्रामीण पट्टय़ात स्त्री-पुरुष जन्मदरात विलक्षण तफावत पडत असल्याचे वारंवार अधोरेखित होत असताना त्याचे प्रतिबिंब मतदार यादीतही उमटल्याचे लक्षात येते. हाच महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन म्हसळा ICDSच्या प्रकल्प अधिकाऱ्यांसहअंगणवाडी सेवीका व मदतनीस यानी ICDSच्या कार्यालय,पंचायत समिती , ग्रामिण रुग्णालय, एस.टी. स्टँड शहरी व ग्रामीण भागात महिला व पुरुष मतदारांमध्ये जी तफावत आहे, त्या तुलनेत दिघीरोड पर्यंत तालुक्यातील आमजनतेला "बेटी बचाव बेटी पढाओचा"संदेश देण्यासाठी भव्य रॅली, पथनाटय सादर केले.प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे,गट विकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांचे मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या रॅलीत सभापती उज्वला सावंत,माजी सभापती छाया म्हात्रे,डॉ.सागर काटे,विस्तार अधिकारी प्रमोद गायकवाड,समण्यक कल्पेश पालांडे, पर्यवेक्षिका रेणुका पाटील,श्रीमती दिपाली पालवे,श्रीमती वैष्णवी कळबावसकर यांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमात पथनाटीका व समुहगीत गाण्यात अंगणवाडी सेविका निधी दर्गे,सायली कार्लेकर, सानिका उद्धरकर,श्रीमती म्हशीलकर, श्रीमती रेणुका पाटील आदींचे योगदान होते.या रॅलीत पोलीस विभागाचे संतोष चव्हाण, स्वप्नाली पवार,वैशाली वारघुडे, तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस,पंचायत समती आरोग्य विभाग अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र परिचारिका आदींनी सहभाग घेतला होता. प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे यानी राज्यांतील अनेक जिल्ह्यांतील शहरी व ग्रामीण भागात महिला व पुरुष मतदारांमध्ये जी तफावत आहे, त्या तुलनेत म्हसळा तालुक्यात महिला व पुरुष मतदारांत महिला मतदार जास्त आसल्याचे या वेळी सांगितले.
"मुलींच्या निभावासाठी, संरक्षणासाठी व सबलीकरणासाठी 22 जानेवारी 2015 ला बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियाना ला सुरुवात झाली. महिला कल्याण योजनांसंबंधी समाजात जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. पक्षपाती लिंगनिवडीची प्रक्रिया टाळणे, मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे, मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे."
व्यंकट तरवडे, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास केंद्र(ICDS) म्हसळा

"GirlForce: Unscripted and Unstoppable." या थीमवर यंदा जगभरात बालिका दिन साजरा केला जाणार आहे. आज 21 व्या शतकात मुलीदेखील मुलांच्या तोडीस तोड स्पर्धेच्या युगात उतरल्या आहेत. त्यांना आपण सर्व म्हसळा करानी सबळ करुया "
-वाय.एन.प्रभे, गट विकास आधिकारी , म्हसळा

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा