आमचा डीएनए भारतीय आहे आम्ही भारतवासी आहोत.
एन.आर.सी.आणि सी.ए.ए.विरोधात म्हसळा तालुका शहरात हजारोंच्या संख्येने संयुक्त समाज मोर्चा
म्हसळा - सुशील यादव
भारत सरकारने देशात सुधारीत भारतीय नागरी कायदा लागू संमत केला आहे परंतु काही राज्यात ह्या कायद्याला मोठया प्रमाणात तेवढाच विरोध आहे.महाराष्ट्रात काही ठिकाणी विरोध तर काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे पहायला मिळत असताना म्हसळा येथे "संयुक्त समाजाचे नावाने काल (०३ जानेवारी)भव्य मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव व काही अन्य समाजाचे नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.आयोजित मोर्चाचे सभेत प्राध्यापक कानिफ भोसले,काझी हुसेन माहिमकर,कासारे,मिलिंद साळवी,अलिशेट कौचाली,राकेश मोरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावावर आधारित एन आर सी विरोधात एकत्र येऊन आपल्यावर आणि विशेषतः जातीय आधारित लादलेल्या कायद्याला विरोध करून तो केंद्र सरकारने रद्द करावा अशी जाहीर मागणी केली.सर्वधर्म समभाव असलेल्या आणि लोकशाही प्रधान सुधारीत भारतीय नागरिकत्व कायदा(एन.आर.सी.)आणि सी.ए.ए.कायदा लागू करू नये म्हणून त्या विरोधात देशभर निदर्शने,आंदोलन सुरू असतानाच म्हसळा तालुक्यातील अल्पसंख्याक समाज बांधवानी पुढाकार घेऊन या कायद्याला शासन दरबारी विरोध दर्शविण्यासाठी आणि संविधानाचे रक्षणासाठी,समाज एकता व बंधुता कायम राहण्यासाठी 'संयुक्त समाज म्हसळा तालुका मोर्चा'द्वारे "एकता रॅली" काढुन निषेध केला .काढण्यात आलेल्या मोर्चाचे सुरवातीला एसटी स्थानक म्हसळा शेजारील अंजुमन क्रीडांगण येथे भव्य सभा झाली आणि नंतर सभेतील नागरिकांची एकता रॅली तहसीलदार कार्यालयाकडे जाऊन वरील कायद्याना विरोध असल्याचे निवेदन म्हसळा तहसीलदार श्री शरद गोसावी यांना देण्यात आले.अतिशय शिस्तबद्ध झालेल्या मोर्चाचे सूत्रसंचालन मुबशीर जमादार सर ,शेख सर यांनी संविधान वाचन केले.निवेदन देते वेळी अलिशेट कौचाली, नाजीम चोगले,महमदभाई मेमन,नाझीम हसवारे,फझल हलदे,
दानिश लांबे,मुसद्दीक इनामदार,नासिरभाई मिठागरे, समीर चोगले,रियाज घराडे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर मोर्चा च्या बंदोबस्तासाठी दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
إرسال تعليق