यश प्राप्तीसाठी नियोजन गरजेचे आहे .. जितेंद्र सातानाक
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
आजच्या युगात स्त्री ने सर्व क्षेत्रात उच्च भरारी घेतली आहे .पुरुषप्रधान संस्कृतीत स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करण्यात स्त्री यशस्वी झाली .यश प्राप्ती करणाऱ्या महिलांनी वेळ व श्रम यांचे सांगड घालून ध्येय सिद्धी प्राप्त केली आहे .त्यामुळे आपल्या आयुष्यात नियोजनाला अतिशय महत्व आहे असे प्रतिपादन श्रीवर्धन चे नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांनी केले .
एस एन डी टी महाविदयलाच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी जितेंद्र सातनाक यांनी विद्यर्थिनी वर्गाशी संवाद साधला .सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चे औचित्य साधून विद्यालयाने इंद्रधनुष्य 2020 या शीर्षका खाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
जितेंद्र सातनाक यांनी सांगितले की आज तुम्ही आयुष्यातील अशा टप्प्यावर आहात जेथून तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्प तयार करण्याचे काम करणार आहात .आजचा काळ तुमच्या आयुष्यातील शांततेचा काळ आहे .शांततेच्या काळात केलेले कष्ट आयुष्यातील अशांततेच्या काळात उपयोगी पडतात .तुमच्या स्वप्नाच्या व ध्येयाच्या दृष्टीने विचार कृतीची गुंफण करण्यास आताच सुरुवात करा आयुष्य निश्चितच आनंदी बनेल .महाविद्यालयातील विद्यार्थीनिशी सातनाक यांनी मुक्तपणे संवाद साधला .आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे .कायद्याने स्त्रियांना अनेक अधिकार बहाल केले आहेत .स्त्री संरक्षणाला कायद्याने प्राधान्य दिले आहे .विविध स्त्री विषय कठोर कायदे निर्माण करण्यात आले आहेत .आजची स्त्री ही आधुनिक काळात निर्भय पणे वावरणारी स्त्री आहे .असे जितेंद्र सातनाक यांनी सांगितले .इंद्रधनुष्य या कार्यक्रमाला कॉलेज समनव्यक प्राध्यापक अनिल वाणी , तृप्ती विचारे , करिष्मा चोगले , विनय वैद्य , गणेश सावंत , गणेश पाटील , उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनस्वी साठे व सूत्रसंचालन प्रचिती काप व तनुजा दुर्गावले यांनी केले .
إرسال تعليق