तालुक्यातील शेतकऱ्याना D. B.T. व्दारे मिळणार थेट अनुदान

म्हसळा तालुक्यात शेतकऱ्याना D. B.T. व्दारे मिळणार थेट अनुदान ; केंद्र, राज्य व जिल्हा परिषद सेस मधुन मिळणार शेतकऱ्याना लाभ

म्हसळा प्रतिनिधी
केंद्र पुरस्कृत, राज्य पुरस्कृत व जिल्हा परिषद सेस योजनेच्या माध्यमातुन तालुक्यातील शेतकरी -बागायतदाराना वैयक्तिक योजनांचा लाभ मिळणार आसल्याचे म्हसळा पं.स.चे गट विकास अधिकारी वाय.एन. प्रभे यानी सांगितले.
जिल्हा परिषद सेस योजने अंर्तगत खालील अवजारे व कृषी साहित्याचा शेतकऱ्याना होणार लाभ.
१) ताडपत्री (८X८ व ६X६ ) ७५ % अनुदान
२)सोलर होम लाईट खरेदी ७५ % अनुदान
३) पिक सरक्षण अवजारे ५ ० % अनुदान
४) ब्रश कटर . ५ ० % अनुदान
५ ) ऑईल इंजिन (२,३,५H.P) ५ ० % अनुदान
६) इलेक्ट्रिक पंप(३,५H.P) ५ ० % अनुदान
राज्य पुरस्कृत किटक नाशक खरेदी ५ ० % अनुदान.
केंद्र पुरस्कृत योजना मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ( अनु. जाती करीता), विरसा मुंडा कृषी क्रांती योजना, ( अनु.जमाती करीता). बहुतांश लाभार्थी साठी अर्ज, ७/१२,८अ, उतारा, बँक पास बुक, आधार कार्ड, झेरॉक्स प्रत,लाभार्थी निवड ठराव आदी कागदपत्रांची आवश्यकता लागते असे यानी सांगितले.
२०१९-२० या वर्षासाठी कृषी विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी निधी उपलब्ध आहे. यातून शेतकऱ्यांना यावर्षी वरील प्रकारची अवजारे, साहित्यासाठी अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांनी ही अवजारे स्वत: खरेदी करायची असून, खरेदीच्या पावत्या व आवश्यक कागदपत्रे पंचायत समितीच्या कृषी विभागा कडे सादर करायचीआहेत. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम थेट जमा केली जाणार आसल्याचे म्हसळा पं.स.चे कृषी विस्तार अधिकारी साळी यानी सांगितले.
"जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या योजनेतून शेतकऱ्यांना अनुदानावर सुधारित अवजारे, साहित्य पुरवठा करण्यात येतो. यावर्षी या योजनेतून शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) धोरणानुसार कृषी अवजारे खरेदी साठी ७५ ते ५० .टक्के अनुदान देण्यात येणार आहे."
मंगेश साळी,कृषी विस्तार अधिकारी, पं.स. म्हसळा.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा