म्हसळा ग्रामिण भागाचे बरोबरीने शहरांत माकडांचा उपद्रव वाढला.

म्हसळा ग्रामिण भागाचे बरोबरीने शहरांत माकडांचा उपद्रव वाढला ; शहरातील माकड चेष्टा कोण कांबविणार महिलांपुढे पडली समस्या.

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
समृध्द वनसंपदा लाभलेल्या म्हसळा तालुक्यात आता वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होवू लागला आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून तालुक्यात रानडुक्करे, रानगवा, निलगाय, माकड, वानर व केलट्यानी रानात शेतीत धुमाकुळ घालत असताना वन्य श्वापदानी काही जणांचे प्राण घेतले आणि लाखो रुपयांची शेती बागायतीची हानी केल्याच्या घटना पुढे येत आहे.नुकसानी बाबत म्हसळा बनविभागातर्फे माहीती घेतली असता २०१४ -२०१९ या मागिल पाच वर्षांत वन्य श्वापदे, वानर, माकड
केलट यानी केलेल्या पिकनुकसानी साठी शासनाने रु ६ लक्ष ३७ हजार ९५५ नुकसान भरपाई शासनाने शेतकऱ्याना दिली.वन्य श्वापदांकडून पाळीव प्राण्यांवर ( गाय, बैल,म्हैस ) झालेल्या हल्ल्यामुळे रु २ लक्ष ५७ हजार ७५ शासनाने शेतकऱ्याना नुकसान भरपाई . मनुष्यहानीसाठी रु १ लक्ष नुकसान भरपाई दिल्याचे परिक्षेत्र वन अधिकारी निलेश पाटील यानी सांगितले
साधारणपणे माकड, वानर ,केलट या जाती पूर्वी सर्रास जंगलात आढळत असत. परंतु गेल्या काही वर्षापासून म्हसळा शहरांमध्ये माकडानी हैदोस घातला आहे. त्यामुळे महीलांपुढे माकडानी समस्या निर्माण केली आहे, माकडांची तक्रार वनविभागाकडे का नगरपंचायती कडे करायची ही समस्या महीला वर्गाला पडली आहे.
शहरातील कन्या शाळा ,विद्यानगरी , तांबट आळी , एकता नगर, ब्राह्मण आळी, वाऱ्याचा कोंड, जैन कॉलनी, कुंभार वाडा, गोळवाडी, नवानगर या परिसरांत परसबागेतीत फळ व फुले झाडे, वाळत टाकलेल्या वस्तू, ब्लॉकचे स्लायडींग उघडून विविध जिन्नस पळविणे, बाजारपेठ परीसरांत घुसखोरी करून किराणा व्यापाऱ्यांचे गोडाऊन लक्ष्य केले आहे.
माकडे जंगल सोडून मानव वस्तीकडे का येतात, याचाही विचार होण्याची गरज आहे. जंगलाना लागणारे वणवे आणि वृक्षतोड ही कारणे याला कारणीभूत आहेत. पूर्वी जंगलांमध्ये आंबा, जांभूळ, कोकम, बांबू, हसन, वटवृक्ष अशी पशुपक्षांचे खाद्य असलेली झाडे मुबलक प्रमाणात असत. मात्र वृक्षतोडीत ही झाडे राहिली नाहीत. वनखाते जंगलात जी वृक्ष लागवड करते ती आकेशिया, बाभूळ, निलगिरी यासारखी जलद वाढणारी झाडे असतात. मात्र, ही झाडे तृणभक्षक प्राण्यांकरिता उपयोगाची नाहीत. त्यामुळे वन्य प्राणी आता मानवी वस्तीकडे वळले आहेत. हे विस्कळीत अन्नसाखळीचे सारे दुष्परिणाम आहेत. 

"वनखात्याने आता हा माकड उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याची गरज आहे. एकतर माकड पकड मोहीम राबवा किंवा माकडांना पुन्हा जंगलात परतवण्यासाठी काहीतरी उपाय आखा, अशी मागणी शेतकरी बागायतदारां कडून होवू लागली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कौलारू घरांची संख्या अधिक आहे. मात्र माकडे दणादण उड्या मारून घरांची कौले, कोने मोठ्या प्रमाणावर फोडू लागले आहेत. हे नुकसान सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.   त्यामुळे हत्तींप्रमाणेच माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी वनखात्याने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे."
श्रीमती वैशाली सावंत, माजी जि. प. सदस्य, म्हसळा.

रानडुक्करे, रानगवा, निलगाय, माकड, वानर व केलटानी रानात शेती, फळ बागाना नुकसान झाल्यास शासनाकडून नुकसान भरपाई मिळते, शेत पिकाला कमान रु१००० ते २५००० हजार पर्यंत, फळपिकामध्ये नारळ रु ४८००, सुपारी रु२८००, आंबा रु३६००, केळी रु१२०, इतर फळझाडे रु ५०० ( प्र. झाड)याप्रमाणे योग्य अवधीत वनविभागाकडे तक्रार केल्यास नुकसान भरपाई मिळू शकते.
निलेश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी म्हसळा
.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा