"बेटी बचाव बेटीपढाव"अभियानांतर्गत जनजागृती रॅली...


तळा (किशोरपितळे)
रायगड जिल्हापरिषद एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प तळा यांच्या माध्यमातून "बेटी(लेक )बचाव बेटी(लेक)पढाव"या कार्यक्रमांतर्गत जनजागृती २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी रोजी करण्यात आले होते. यावेळी मा. तहसीलदार अण्णापा कनशेट्टी, बि.डी.ओ. विजय यादव, पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे, माजी सभापती तथा सदस्याअक्षरा कदम, सभापती देवकी लासे,नगरसेवक चंद्रकांत रोडे, प्रकाश गायकवाड, यांच्याउपस्थितीत राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून माजीसभापती अक्षरा कदम यांनी चित्ररथास हिरवे निशाण दाखवून शुभारंभ केला. तहसिलच्या प्रांगणात सुरु करण्यात आले.२०जानेवारी ते२६जानेवारी लेक वाचवा लेक शिकवा हे अभियान राबविण्यात आले.यावेळी गीतातुन व पटनाट्यातून जनजागृती करण्यात आली.
       मुलींचा जन्म दर वाढवणे,स्त्रीभ्रुण हत्या रोखणे, 
मुलीचे संगोपनआणी वाढदिवसमुलीच्या शिक्षणासाठी प्रोत्साहीत करणे या उद्दीष्टाने करण्यात आले आहे असे प्रकल्प अधिकारी वंदना शिंदे यांनी सांगितले. एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प अधिकारी वंदना शिंदे यांच्या संकल्पनेतून अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्या सहकार्याने शासनाचे विविध उपक्रम राबविण्यात येतआहेत.स्त्री ही सुष्टीची निर्मिती तर बालके राष्ट्रीय संपत्ती आहे भावी पिढी सुदृढ व सशक्त निरोगी व्हावी या दृष्टीनेशासन मोठ्या प्रमाणात अनेक उपक्रम राबवित असते याचाच एक भाग म्हणून राबविण्यात आला.या उपक्रमाचा समारोप मा.गिताताई जाधव सभापती महिला बालकल्याण रायगड जिल्हा परिषद यांच्या हस्ते करण्यात आला.या रँलीत व चित्र रथात अंगणवाडी सेविका, आशासेविका, पर्यवेक्षिका यशवंती राऊत, किर्ती भाटकर,व शिपाई राहुल डोंबाळे यांच्या सहकार्याने उपक्रम राबवण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा