● राजिप शाळा घुम व पाष्टी शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात
◆ मी मराठी प्रतिष्ठान रायगडचे सामाजिक कार्य कौतुकास्पद - माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
जन्माला आल्यानंतर ज्या समाजात राहून मोठे झालो आहोत तसेच विद्यार्थी दशेत असताना शिक्षण घेण्यासाठी येत असलेल्या अडीअडचणी काय काय होत्या त्यावर मात करून आज मितीला मुंबई सारख्या शहरात राहून उत्तम प्रकारे स्वतःचा व्यवसाय, नोकरी, धंदा सांभाळून जे काही आर्थिक धन कमावत आहेत त्यामधील थोडासा हिस्सा सामाजिक कार्यासाठी लावावा व समाजसेवा करावी या उद्देशाने प्रेरित होऊन रायगड जिल्ह्यातील म्हसळा, श्रीवर्धन, तळा व इतर काही तालुक्यातील तरुणांनी सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवत एकत्र येऊन "मी मराठी प्रतिष्ठान रायगड" ची स्थापना केली आणि या प्रतिष्ठान मार्फत गोरगरिबांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत करणे, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शाळेपयोगी वस्तूंचे वाटप करणे असे समाजोपयोगी कामे हाती घेतली आहेत.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी मराठी प्रतिष्ठान रायगड मार्फत "एक हात मदतीचा" या उद्देशाने म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुम व राजिप शाळा पाष्टी येथील विद्यार्थ्यांना शाळेपयोगी शैक्षणिक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले तसेच शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी घुम व पाष्टी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी मी मराठी प्रतिष्ठान मार्फत भेटवस्तू दिल्यामुळे आयोजकांचे सामाजिक कामाचे कौतुक करून धन्यवाद दिले व आभार मानले.
कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हसळा नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक श्री.दिलीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले आजच्या धावपळीच्या जीवनात सामाजिक कार्य करण्यास युवा वर्गाने पुढाकार घेतला पाहिजे. आज ज्या तरुणांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांनी आपल्या गावातील, समाजातील गोरगरीब मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेण्यास प्रोत्साहन द्यावे. तरुणांनी संघटना, मंडळ, प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांमध्ये काम करीत असताना कोणत्याही प्रकारचे हेवे दावे किंवा स्वार्थीपणा ठेऊ नये. आपण एखादे पद भोगले की त्या पदावर दुसऱ्या सहकाऱ्यांना काम करण्याची संधी दयावी. संघटनात्मक व सांघिक वृत्ती जोपासली तर संघ भावना वाढेल आणि संघटनेतील एकीचे बळ कायम स्वरूपी टिकून राहील असा मोलाचा संदेश दिलीप कांबळे यांनी नवतारुणांना दिला. तसेच मी मराठी प्रतिष्ठान च्या सामाजिक उपक्रमांची स्तुती करून प्रतिष्ठानचे लोकोपयोगी काम कौतुकास्पद असल्याचे दिलीप कांबळे यांनी सांगितले. तसेच पाष्टी गावचे सुपुत्र उद्योगपती तथा समाजसेवक प्रदिप दिवेकर यांनीही मी मराठी प्रतिष्ठानच्या समाज हिताच्या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यात प्रतिष्ठानला सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तालुका उपाध्यक्ष विपुल गायकर यांनी आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजासाठी व तळागाळातील घटकांसाठी काहीतरी चांगले काम करण्याच्या उद्देशाने आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांघिक भावनेने काम करीत आहोत असे सांगून भविष्यात देखील प्रतिष्ठानच्या मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील असेल विपुल गायकर यांनी सांगितले.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे यांसह उद्योगपती समाजसेवक प्रदिप दिवेकर, घुम - रुद्रवट ग्रापं सरपंच केतन आग्रे, मांदाटने ग्रापं सरपंच चंद्रकांत पवार, माजी सरपंच राजाराम धुमाळ, माजी पोलीस पाटील धोंडू घोले, सचिव प्रसाद महागावकर, शांताराम कांबळे, प्रकाश लाड,संतोष दिवेकर, महिला अध्यक्षा सुवर्णा धुमाळ, प्रतिष्ठानचे संस्थापक आदेश लाड, सुधीर कांबळे -जिल्हाअध्यक्ष, दिनेश वरणकर -खजिनदार, समीर दळवी - कार्याध्यक्ष, सचिन खेडेकर- संघटक,विराज महाडीक- संपर्क प्रमुख, ऋषीकेश खताते-सल्लागार, कल्पेश महाडीक-उपाध्यक्ष, मिलिंद काते-उपखजिनदार, माणगाव तालुका कमिटी उपसचिव आशिष लाड, सागर खेडेकर, चिंतामणी खेडेकर, म्हसळा तालुका कमिटी अध्यक्ष हरीष लाड, उपाध्यक्ष विपुल गायकर, सचिव प्रफुल महागावकर, खजिनदार निलेश कासार, संपर्कप्रमुख विशाल तटकरे, संघटक लंकेश धुमाळ, उपखजिनदार प्रितेश महाडीक, श्रीवर्धन तालुका कमिटी अध्यक्ष समीर टाकले, तळा तालुका कमिटी अध्यक्ष नयन काते तसेच प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रापं सदस्य, घुम व पाष्टी शाळेचे मुख्याध्यापक, सहशिक्षक व विद्यार्थी, ग्रामस्थ महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق