अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनची देशभरात विज्ञान चळवळ

 फोटो : वरळी येथील नेहरू तारांगण मध्ये क्युरिओसीटी कार्निवल उपक्रमात मांडण्यात आलेल्या शालेय अडचणींच्या प्रतिकृती

कार्निवल उपक्रमातून मुलांच्या शाळा अंतर्गत अडचणींची यात्रा नेहरू तारांगण मध्ये साकारली

◆ हजारो विद्यार्थ्यांनी दिली इनोव्हेशन कार्निवल नाविन्यपूर्ण यात्रेला भेट 

● अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनची देशभरात विज्ञान चळवळ 

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

  अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन अंतर्गत देशभरात सुरू असलेल्या विज्ञान चळवळीचा भाग महाराष्ट्रातून देखील तेवढ्याच वेगवान गतीने होताना दिसून येत  आहे. देशात २२ राज्यात अगदी सहज सोपी पद्धत वापरून विज्ञानाची गोडी निर्माण करणारी अशी एकमेव ही संस्था मुलांच्या निरनिराळया उपक्रमातून भेट देत असून मुलांची कल्पनाशक्ती वाढविणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. नुकताच नेहरू तारांगण वरळी येथे सुरू असलेल्या क्युरिओसीटी कार्णीवल या उपक्रमातून एक नव्या उंचीवर मुलांच्या अंगी असलेल्या कलाकौशल्याची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी हा उपक्रम मुलांना त्यांच्या शाळा अंतर्गत अडचणींना कशा पद्धतीने सोडविता येईल याकरिता कार्णीवल उपक्रमाचे आयोजन नेहरू तारांगण येथे करण्यात आले. या उपक्रमात नवी मुंबई येथील माध्यमिक शाळेतील मुलांनी साकारलेल्या प्रोटोटाइप संकल्पनेची यात्रा या कार्णीवल महोत्सवाचे मुख्य उद्देश ठरले आहे. यामध्ये शाळेतील मैदान ते वर्ग खोली पर्यंत उदभवणारे कोणतेही अडचणींचे प्रश्न विद्यार्थ्यांनी डिझाइन कल्पनेतून साकारली असून यामध्ये अनेक उपकरणांचा वापर या मध्ये केल्याचं दिसून येत आहे. नुकतंच मुंबईत साकारण्यात आलेल्या या उपक्रमात ४००० विद्यार्थी सहभागी होऊन या कार्निवल यात्रेचा आनंद घेतल्याचे सांगण्यात आले आहे.  
या उपक्रमाची अनेक राज्यातून विस्तारित शाखा ही भविष्यातील विद्यार्थ्यांची काळाची गरज असून यामधून देशाचे शाळांतर्गत उदभवणारे अडथळे हे मार्गी लावण्याची काम या उपक्रमा मागचे मुख्य उद्देश असल्याचे अगस्त्याचे जनरल मुख्य नितीन देसाई यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा