तळा : किशोरपितळे
शिवसंभू प्रतिष्ठान मुंबई यांचा ४वा वर्धापन दिन तळा येथील गो म वेदक विद्यामंदिर च्या प्रागंणात २६ जानेवारीचे औचित्य साधून साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर शिवव्याख्याते प्रा.निलेश कोरडे, अँड चेतन चव्हाण नगरसेवक श्रीराम कजबजे चेअरमन कनिष्ठ महाविद्यालय, विठोबा चांडीवकर नगरसेवक बाँडी बिल्डर सागर कातुर्डे,राणी सुर्वे कराटे पटू, शिर्के गुरूजी, प्रणीत पोळैकर तळेगड संस्कृती संवर्धन अध्यक्ष, चंद्रकांत खातू, कमा पटेल उपस्थित मान्यवराचे स्वागत करण्यात आले.सकाळी तळगड पुजन शिवकालीन पुरातन शस्त्र प्रदर्शन,व शिवचरित्र व्याख्यान, शाळेला चाललो आम्ही उपक्रम५साहित्य वाटप,शालेय विद्याथियांचा गुणगौरव सोहळा, विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते प्रारंभी सचिन कांबळे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाउन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.यावेळी प्रा.कोरडे म्हणाले की या महाराष्ट्राला जिजाऊ माँसाहेब सारखी आई मिळाली व शिवशंभूसारखा रयतेचाराजा लाभला शिवरायांनी अवघ्या आठव्या वर्षी एक एक गड सर करायला सुरूवात केली.याप्रसंगी सिंहगड चा दाखला दिला शिवरायांच्या कारकिर्दीच्या इतिहासाची पाने उलगडून आठवणीना उजाळा दिला शिवरायाचे आठवावे रूप आठवावा प्रताप तो घराघरात जन्माला आला पाहिजे त्यासाठी पहिल्या जिजाऊ घडल्या पाहिजेत तर शंभूराजे जन्माला येतील त्यासाठी माझ्या माता भगिनींनी आपल्या मुलींना चांगले संस्कार द्या.बौद्धिक व्यक्तीमत्व घडवा मोबाईलचे
युगअसले तरी कामापूरता द्या.मूलीचे लग्न झाल्यावर तीने त्या घराचे नंदनवन केले पाहिजे नाही तर तीच नरक देखील बनवते याचा दाखला दिला भावी पिढी संस्कारक्षम बनवली पाहिजे.शिवरायाची पुस्तके चरित्र वाचली पाहिजेत तरच शंभूराजे या भूतलावर पुन्हा जन्म घेतील असे व्याख्यानात व्यक्त केले.

إرسال تعليق