माझ्या वर अन्याय झाला होता त्यामुळे मी उपोषणाला बसलो .आज मला लेखी आश्वासन देण्यात आले आहे .त्यामुळे मी माझे उपोषण तात्पुरत्या काळासाठी स्थगित करतो. (उपोषण कर्ते चालक सतीश देसाई )
म्हसळा प्रतिनिधि : अरुण जंगम
श्रीवर्धन एस टी आगारातील चालक सतीश विनायक देसाई यांनी २४ जानेवारी पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती .माझी ड्युटी अन्यायकारक पद्धतीने बंद करण्यात आली .आगार व्यवस्थापक एम जी जुनेदी मला मानसिक त्रास देत आहेत. तसेच त्यांनी माझे आर्थिक नुकसान केले आहे त्यामुळे त्यांच्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देसाई यांनी केली होती .एस टी चे अधिकारी ज्ञानोबा माळी व प्रवीण पाटील यांच्या बरोबर उपोषण कर्ते यांच्या वतीने कामगार सेना विभागीय सचिव विजय केळकर , संकेत नेहरकर व माणिक तांबोळी यांनी सकारात्मक चर्चा करून सदरचे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला .आगार व्यवस्थापक एम जी जुनेदी यांच्या जाग्यावर दुसरा प्रभारी अधिकारी नेमण्याच्या उपोषण कर्त्याच्या मागणी नुसार मंगळवार पासून श्रीवर्धन आगारात नवीन वाहतुक निरीक्षकाची मागणी मान्य करण्यात आली .जेणे करून कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दखल एस टी च्या प्रशासनाने घेतलेली आहे .तसेच उपोषण कर्ते देसाई यांच्या वरती झालेल्या अन्यायची मध्यवर्ती कार्यालया तून चौकशी आदेश देण्यात आले आहेत .चौकशी अंती दोषी व्यक्ती वर कारवाई करण्याचे संकेत अधिकारी वर्गाने दिले आहेत .सतीश देसाई यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवण्यासाठी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी कामगार सेनेच्या १४ सभासदांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते .विभागीय सचिव विजय केळकर हे स्वतः उपोषणात सहभागी झाल्याने एस टी प्रशासनावर दबाव वाढला होता .तसेच श्रीवर्धन तालुका शिवसेना पक्ष संघटनेने उपोषणाला जाहीर पाठींबा दिला होता .तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर , संतोष वैश्विकर , नगरसेवक प्रीतम श्रीवर्धनकर यांनी उपोषण ठिकाणी तीन दिवस उपोषण कर्त्याची भेट घेतली होती .तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांनी उपोषण कर्त्याचे निवेदन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या कडे सादर केले होते .
कामगारांवर होणार अन्याय सहन केला जाणार नाही .अधिकारी वर्गाच्या मनमानी विरोधात कामगार आयुक्तांकडे तक्रार केली आहे .सतीश देसाई यांना दिलेले लेखी आश्वासनाची परिपूर्ती झाली नाही तर कामगार सेना संपुर्ण रायगड जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करेल.
-विजय केळकर (विभागीय सचिव कामगार सेना रायगड )

إرسال تعليق