नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे यांचा जाहीर सत्कार


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) 
परळचे प्रेरणास्थान हुतात्मा बाबू गेनू स्मारकाजवळ, सामाजिक कार्यकर्ते समन्वय समिती, मैत्री संस्था व संकल्प संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "प्रजासत्ताक दिनाच्या" पूर्वसंध्येला "शहिदांना अभिवादन व सामुहिक संविधान वाचन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाची सुरुवात नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या थेट १२व्या वंशज व कार्यक्रमाच्या सत्कारमुर्ती साहित्यिका डॉ. शीतल मालुसरे व प्रमुख पाहुणे स्थानिक नगरसेवक व बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल कोकिळ व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास तसेच मुक्त पत्रकार व लेखक स्वप्निल वाडेकर, मैत्री संस्थेचे संस्थापक सुरज भोईर आणि संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद हिवाळे व आदी मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा बाबू गेनू यांना पुष अर्पण व अभिवादन करुन करण्यात आली. 
नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याचा डंका अखंड हिंदुस्थानात चित्रपटाच्या माध्यमातून सर्वत्र दुमदुमत असतानाच ह्या चित्रपटाच्या सल्लागार आणि शिक्षक व साहित्यिका डॉ. शीतल मालुसरे यांचा सत्कार स्थानिक नगरसेवक व बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल कोकिळ यांच्या हस्ते करण्यात आला. 
तत्पूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. शीतल मालुसरे यांनी भूषविले. वैभवी गावडे, मंजू सराठे, माधुरी फालक, प्रदीप बडदे, प्रसाद कुळकर्णी व विलास देवळेकर यांनी देशप्रेमाने ओतप्रोत कवितांचे सादरीकरण केले आणि उपस्थितांची दाद मिळवली.
सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी  करणाऱ्यांना प्रजासत्ताक सन्मान  पुरस्कार-२०२० ने देऊन  गौरविण्यात आले. तिरंगा पट्टा, पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी गुरुदत्त वाकदेकर यांनी नेहमीप्रमाणे आपल्या ओघवत्या शैलीत व वेळेचे भान ठेवून उत्तमरीत्या केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी संविधान प्रास्तविकाचे सामुहिक वाचन केले. सुरज भोईर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी प्रविण शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा