श्रीवर्धनमध्ये ५२० शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा १ , ४०८ शेतकयांना ३८ लाख ९७ हजारांचे वाटप
गणेश प्रभाळे : दिघी
परतीचा पाऊस व वादळी संकटाने श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले , त्यामुळे अडचणीत सापडलेला शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी , यासाठी श्रीवर्धनमध्ये प्रशासनाकडून तातडीने भातशेतीचे पंचनामे करण्यात आले . मात्र , अद्याप ५२० शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत .श्रीवर्धन तालुक्यात ऐन भातपिके कापणी वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . तयार झालेले संपूर्ण भातपीक पाण्याखाली गेल्याने नुकसानभरपाई मिळावी म्हणून , कृषी व महसूल विभागाने १ , ९२८ शेतकन्यांच्या पिकांचे पंचनामेही केले . मात्र , आजतागायत तालुक्यातील सुमारे ५२० शेतकरी शासकीय नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत . अतिवृष्टीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून ऑक्टोबरपासून शेतीचे पंचनामे करण्यात आले . यामध्ये तालुक्यातील पिकाखालील एकूण क्षेत्र १ , ३२४ हेक्टर भात व १३० . ५० हेक्टर नाचणीचे पीक आहे . अतिवृष्टीमुळे ५४२ . ३० हेक्टर क्षेत्र बाधित असल्याची माहिती श्रीवर्धन तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे . तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १ , ४६५ होती . नंतर अंतिम टण्यातील पंचनामे १ , ३६९ शेतकन्यांचे करण्यात आले .
श्रीवर्धन महसूल विभागाकडून पंचनामे झाल्यावर भातपीक व नाचणीचे पीक नुकसानीपोटी तालुक्याला जवळपास ४० लाखांच्या अनुदानाचा प्रस्ताव करण्यात आला . यातील १ , ४०८ नुकसानग्रस्त शेतकन्यांना ३८ लाख ९७ हजार ६७२ रुपये प्राप्त अनुदानवाटप करण्यात आले आहे . मात्र , अद्याप ५२० शेतकयांना नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नाही , त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत .
शासनाकडून नुकसानभरपाईचा निधी प्राप्त झाल्यानुसार वाटप होत आहे . या संदर्भात तत्काळ शेतकऱ्यांच्या सदर माहितीप्रमाणे भरपाई रकमेचे वाटप करण्यात येते आहे . उर्वरित निधी जमा होताच वाटप करण्यात येईल . - सचिन गोसावी , तहसीलदार , श्रीवर्धन
إرسال تعليق