वेळास आगर येथे माघी गणेश जयंती भक्तिमय वातावरणात संपन्न...


पुष्कर रीळकर : वेळास
वेळास आगर मध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ही माघी गणेश जयंती अगदी भक्तीमय वातावरणात पार पडली. दर वर्षी येथे माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आलेल्या गणेश भक्तांना महाप्रसाद दिला जातो तसेच मंदीरात सत्यनारायणची पुजा होते. दर वर्षी प्रत्येक समाजाच्या लोकांना पुजेला बसण्याचा मान दिला जातो. या वर्षी पूजेचा मान हा कुणबी समाजाला दिला होता होता. पुजा संम्पन्न झाल्या नंतर रात्री सांस्कृतिक  कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
१९७६ साली जिर्णोद्वार झालेल्या मंदिराचं सन २००७ रोजी पुनर्बांधणी सोहळ्याचा हा १३ वर्धापन सोहळा आहे. ११-५-१९७६ रोजी या मंदीराच जिर्णोद्वार मा.रविंद्र ना. राउत यांच्या हस्ते झाले होते. त्या नंतर २२ जानेवारी २००७ ला या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली.
तेव्हापासून  वेळास आगर येथे अतिशय भक्तिमय वातावरणात गणेश जयंती साजरी केली जाते

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा