नवसाला पावणारा देवज्ञ समाज म्हसळ्याचा " माघी गणेश"


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरांत देवज्ञ समाजाच्या गणेश मंदीराची फार मोठी आख्यायिका आहे. माघ महिन्यातील म्हणजे मंगळवार दि.२८ जानेवारी २०२० रोजी विनायक चतुर्थीला माघी गणेश जयंतीचा मोठा उत्सव होणार आहे.
देवज्ञ समाजाच्या मंदीरातील गणेश मूर्तीचा आकार व प्रसन्नता या बाबत फार मोठी आख्यायीका आहे. हा गणेश नवसाला पावणारा , भक्तांचे संकटकाळी धावणारा व तारण कर्ता आसल्याचे अनेक भक्त सांगतात.
गणेश मंदीराची आख्यायिका शहरांतील ग्रामदेवता असणाऱ्या श्री धावीर मंदीराचे चबुतऱ्यावर भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या पारंब्या गुहेच्या आकाराप्रमाणे होत्या व त्यातं सुमारे १२७ वर्षापूर्वी शेंदूर लेपन केलेली गणेश मूर्तीर्ची स्थापना करण्यात आली होती. महाराष्ट्रांत लोकमान्य बाळ गंगाधर टिळकानी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पायंडा पाडला त्या काळांत स्थानिक मंडळी देशावरील ब्रिटीशांची व जंजीरा सस्थान वरील सिद्दीची राजवट संपुष्टात यावी म्हणून प्रार्थना करीत असत गणेशाचे पूजन व आराधना स्थानिक मंडळी भाविकतेने करीत असत. तब्बल ४०- ४२ वर्षानी देवज्ञ समाजाच्या मंडळानी पारंब्यातील गणेश मूर्तीची पुर्नस्थापना करण्याच्या उद्देशाने ग्रामदेवतेचा कौल घेतला असता याच परिसरांत मंदीर बांधून पुर्नस्थापना करण्याचा भक्ताना कौल
मिळाला. मंडळीनी नजिकच असलेल्या हिंदू वस्तीतील चौकात ( जगन्नाथ नाना शंकर शेट चौक) सुंदर असे मंदीर बांधून सुरेख ,देखण्या व कोरीव संगमरवरी गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सन १९३८ साली माघ शु. चतुर्थीला करण्यात आली.त्या दिवसापासून या मंदीरात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.१९३५ -३८ या कालावधीत देवज्ञ समाजाचे मुंबई व स्थानिक मंडळातील दानशूर मंडळीच्या सहकार्याने मंदीर उभे करण्यात आले. मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती ही अतीशय महागडया अशा तिबेटीयन संगमरवरी दगडापासून बनविलेली आहे. तिचे रुप भाद्रपद महिन्यातील गणपतीचे साध्यर्म आहे.
म्हसळयातील ग्रामदेवता, श्री गणेश मंदीर, श्री राम मंदीर, श्री राधाकृष्ण मंदीर, श्री मारूती मंदिर अशी सर्व मंदीरे या चौक परिसरांत आहेत. पूर्वी प्रत्येक समाजाकडे एक एक मंदिराची देखभाल असे त्याच पध्दतीने श्री गणेश मंदिराची जबाबदारी सुसंस्कृत व धनाढ्य अशा देवज्ञ समाजाकडे आली असावी असे समाजाचे सस्थापक अध्यक्ष प्रभाकर पोतदार सांगत असत. या वर्षी माघी गणेशोत्सवा निमित्त मंगळवार दि. २८ रोजी पूजा,अभिषेक, किर्तन, भजन, हळदी कूंकू, बुधवार दि.२९ रोजी श्री पूजन, सत्यनारायणाची महापूजा व आर्केस्टा असा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा