संजय खाबेटे : म्हसळा प्रतिनिधी
बहुजन क्रांती मोर्चा ने बुधवार दि. २९ जाने. २०२० च्या भारत बन्दच्या राष्ट्रव्यापी आंदोलनात आमच्या संघटना सामिल होणार नसल्याबाबतचे निवेदन म्हसळा शहरातील हॉटेल, किराणा, कापड, सराफी , रिक्षा व प्रवासी संघटनेने दिले आहे. म्हसळा शहराचे आठवडे बाजाराची फार जुनी परंपरा असून हा बंद सुध्दा आठवडा बाजाराच्या दिवशी येत आहे, बाजारांत असलेली आर्थिक मंदी , गोर-गरीब व्यापारी ग्राहकांचे बंद मुळे होणारे आर्थिक नुकसान. सन २०१९ या वर्षात विविध संघटनानी पुकारलेल्या बंद मध्ये १५ ते २० दिवस बाजारपेठ बंद राहील्यामुळे म्हसळा शहरांतील व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट आल्याचे संबधीत व्यापारी संघटनानी आपल्या निवेदनांत म्हटले आहे. म्हसळयातील व्यापाऱ्यानी अशा पध्दतीचे निवेदन जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधिक्षक रायगड, तहसीलदार पोलीस निरीक्षक याना दिले आहे. बंद, ऑन लाईन खरेदी व मॉल संस्कृतीमुळे आधिच डबघाईत आलेले व्यापारी सततच्या बंद मुळे भरडून जात आसल्याचे किरकोळ व्यापारी रजपूत शेठ यानी म्हसळा लाईव्ह जवळ बोलताना सांगितले.
إرسال تعليق