प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथील दहावीचा विद्यार्थी आदित्य अभय कलमकर याने बारामती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले . याबद्दल आ . आदिती तटकरे यांनी आदित्य याचा शाल , श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन म्हसळा तालुका विज्ञान प्रदर्शनाचे औचित्य साधून सन्मान केला . आदित्यने आतापर्यंत तालुका , जिल्हा , मुंबई विभागीय आणि राज्यस्तरिय कराटे स्पर्धेत विविध बक्षिसे पटकावली आहेत . त्याच्या या यशामुळे केवळ म्हसळ्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून आदित्यचे कौतुक होत आहे . आदित्य कलमकर यांच्या सत्कारप्रसंगी आ . आदिती तटकरे यांनी सांगितले की , आदित्यची ही उल्लेखनीय कामगिरी असून कराटे क्षेत्रात त्याने संपूर्ण म्हसळा तालुक्याचे नाव निश्चितपणे मोठे केले आहे . असे विविध हिरे तालुक्यात दडले असून त्यांना पैलू पाडण्याची जबाबदारी शिक्षकांनी स्वीकारण्याचे आवाहन आ . आदिती तटकरे यांनी केले . याप्रसंगी सभापती छाया म्हात्रे , उपसभापती संदिप चाचले , जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे , गटविकास अधिकारी वाय . एम . प्रभे , गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे , पंचायत समिती सदस्य मधुकर गायकर , माजी सभापती उज्वला सावंत , स्कूल चेअरमन समीर बनकर आदि मान्यवर उपस्थित होते .
إرسال تعليق