म्हसळ्यात सावित्रीनदी पात्रात मच्छीमार युवकावर मगरीचा हल्ला ; युवक गंभीर जखमी


म्हसळ्यात सावित्रीनदी पात्रात मच्छीमार युवकावर मगरीचा हल्ला ; पांगळोली येथील युवा मच्छीमार गंभीर अखमी

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील पांगळोली येथील मच्छीमार फैजान मयनुद्दीन धनसे वय १९ हा युवक सावित्री नदीच्या पात्रात मच्छीमारी करीत असता मगारीच्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची नोंद आज दिं.१६ रोजी म्हसळा वन विभागाचे कोंझरी परीमंडळचे वन अधिकारी बाळकृष्ण गोरनाक यानी केली आहे.याबाबत गोरनाक यांच्या समवेत वनरक्षक अतुल आहीरे , दिलीप वाधे यानी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेची फिर्याद फैजानचे वडील मैनु याने म्हसळा वन विभागात केली होती.याबाबतची हकीकत अशी की, सावित्री नदी पात्रात कोंझरी, कोळे,तोराडी, पांगळोली,निगडी ( ता. मंडणगड- रत्नागिरी ) या परिसरांतील मच्छीमार मोठया प्रमाणांत जिवधोक्यांत टाकून मच्छीमारी करीत असतात ,अशाच तऱ्हेने शुक्र. दिं .१३ डिसें. रोजी सायं.५ ते ६ य्या दरम्यान पांगळोली येथील युवा माच्छिमार फैजान व त्याचा मित्र मुझफ्फर अ.र.धनसे हे दोघे कोंझरी गावा नजीक काळवी, गडदाब या सावित्री नदीला लागून मिळणाऱ्या खाडीत मच्छीमारी करत असताना मगरीने फैजानवर प्राणघातक हल्ला करून त्याचा डाव्या पायाचा गुडघा निकामी केल्याची घटना घडली.फैजान सध्यपरीस्थितीत मिरज येथे उपचार घेत आहे.

"या भागातील खाडींचा भाग निमखाऱ्या पाण्याचा आसल्याने या खाडीत मगरींना(Crocodile) वास्तव्यासाठी पोषक वातावरण आहे, गेल्या काही वर्षांत या परिसरांत मगरींची संख्या वाढली आहे, मगर मांसाहारी असून मासे हे तिचे मुख्य अन्न आहे. पक्षी व जमिनीवरील प्राणी हेही ती खाते. पाणी प्यायला आलेली गुरे लहान वासरे यांवर झडप घालून मगर शिकार करते.यासाठी स्थानिक पातळीवर मोठया प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे. वन विभागाचे माध्यमातून ग्रामसभा,परिसरांत जनजागृतीचे बोर्ड लावणार आहोत "
निलेश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी ,म्हसळा


कोंझरी गावा नजीक काळवी, गडदाब या सावित्री नदीचे पात्र

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा