म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा मेंदडी येथे दि.6 डिसेंबर रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रथम बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म, बालपण, शिक्षण, त्यांनी केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्य यांची माहिती आपले मनोगत व्यक्त करताना दिली.
यावेळी बालअध्यक्ष कु.साहिल पाटील, मुख्याध्यापक किशोर मोहिते, सायली बीर्जे, अब्बास शेख, श्रीम प्रियंका गोसावी यांसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
إرسال تعليق