म्हसळयातील कांदा खवय्याना रहीमतपुर(सातारा) च्या बंड्याचा दिलासा. १२० चा कांदा ६० ते ८० रूपयांत.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
कांद्याच्या चढ्या दरामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.महागड्या दरातील कांदे स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्याची नामी शक्कल रहीमतपुर(सातारा) येथील टेंपोवाला बंड्याने आखली खरी परंतु त्याचा फायदा म्हसळया तील गोर- गरीब कांदा खवय्याना झाला आहे. म्हसळा शहरांत ६७ किराणा व ४ भाजी विक्रेते कांद्याचा घाऊक व किरकोळ व्यवसाय करायचे, घाऊक बाजारांत कांद्याचा भाव प्रचंड वाढल्याने व्यापाऱ्यांची संख्या थोडी फार कमी झाली त्यामुळे शहरात मागणी वाढली व भाव १०० ते १२० पर्यंत स्थिर झाले. याच वेळी रहीमतपुर(सातारा) येथील टेंपोवाला बंड्याने नाममात्र नफ्याने म्हसळा एस.टी. स्टँडवर कांदा व्यवसाय सुरु केला व त्याने रु ६० ते ८० प्र.किलो ने कांदा विक्री सुरु केली. त्याचे नाम मात्र नफ्याचे तत्वाने कांद्याला मागणी वाढल्याने दर १ दिवसाआड बंडया २० ते २५ गोणी कांद्याची विक्री करु लागला.
"माझा मूळचा टेंपो व्यवसाय त्यामुळे टेंपोला भाडे मिळणे व म्हसळा बाजारभावा पेक्षा रु २० ने दर कमी ठेवला. त्यामुळे एकाच वेळी माझा व ग्राहकांचा फायदा झाला."
बंडया टेंपो व्यवसायीक रहिमतपूर, जि.सातारा.
"फुटपाथवरील कांदा व्यवसायीक नव्याने आल्याने आमच्या संसारातील कांद्याचे आर्थिक नियोजन थोडया बहुत काटकस रीने झाले,"
रफीक भाई ऊकये, नया नगर, म्हसळा
إرسال تعليق