म्हसळा पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर


म्हसळा पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर : दुसरा टर्म देखील सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित : छाया म्हात्रे यांना पुन्हा संधी ?

संजय  खांबेेटे म्हसला

म्हसळा पंचायत समितीच्या सभापती पदाचा आरक्षण आज जाहिर झाले असुन, पुन्हा एकदा सर्वसाधारण महिलांसाठी सभापती पद राखीव ठेवण्यात आल आहे. यामुळे सभापती पदाचे स्वप्न पाहणाऱ्या इतर दोन सदस्यांचे स्वप्न भंग झाले आहेत.

मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण झाले. यायाध्ये म्हसळा तालुका पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सर्व साधारण महिला आरक्षण राखीव झाले आहे. म्हसळा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असुन तालुक्यातील चार गणांमध्ये मेंदडी गणातून छाया म्हात्रे (सर्वसाधारण महिला ) आंबेत गणातून उज्वला सावंत ( सर्वसाधारण महिला ), वरवठणे गणातून मधुकर गायकर ( नामप्र पुरुष ) तर पाभरे गणातून संदिप चाचले ( सर्वसाधरण ) हे चारही उमेद्वार राष्ट्रवादी पक्षातून विजयी झाले आहेत. मात्र पहिल्या अडीच वर्षासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्यानंतर पुन्हा येत्या अडीच वर्षासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्यामुळे इतर पुरुष सदस्यांचे सभापती पदाचे स्वप्न भंग झाल्याचे चित्र आहे. आता पुन्हा सव्वा वर्ष आंबेत गणातील उज्वला सावंत ( सर्वसाधारण महिला ) व मेंदडी गणातून छाया म्हात्रे (सर्वसाधारण महिला )
यांच्या पैकी कोणावर जबाबदारी सोपविली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा