डॉ. पल्लवी बनसोडे, वैशाली आहेर यांना “स्वयंसिद्धा पुरस्कार” जाहीर

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह

स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय महिला प्रेरणा संमेलन चिंचवड पुणे येथील प्रतिभा महाविद्यालय येथे रविवार २२ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका विनिता ऐनापुरे या असून, प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी निवृत्त पोलिस महानिरीक्षक
डॉ. विठ्ठलराव जाधव व डॉ. राजेंद्र कांकरिया आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी साहित्य, कला, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना “स्वयंसिद्धा पुरस्कार २०१९” प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.  साहित्य क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी डॉ. पल्लवी बनसोडे व पत्रकारितेसाठी वैशाली आहेर यांचा समावेश आहे.
दुसऱ्या सत्रात “महिला शिक्षण पुरोगामी विचार” या विषयावर चर्चासत्र होईल. संमेलनात महाराष्ट्रातील विविध भागातून साहित्य क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत. विनामूल्य असलेल्या या संमेलनामध्ये रसिकांनी आवर्जून सहभागी व्हावे,असे आवाहन स्वयंसिद्ध प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा