श्रीवर्धनचे महावितरण "रामभरोसे" रिक्त पदांमुळे सेवेचा बोजवारा सात कनिष्ठ अभियंता पदे रिक्त ; उपलब्ध कर्मचाऱ्यांची दमछाक
श्रीवर्धन प्रतिनिधी
श्रीवर्धन येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या दुय्यम कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने ग्राहकांना काम न होऊन परत जावे लागते . विभागातील या कार्यालयांचे काम रामभरोसे ' असल्याचा अनुभव अनेकदा आला आहे . वाढत्या वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी विभागीय अधिकारी भेटत नसल्याने ग्राहक संतप्त झाले ते बघायला मिळतात . ग्रामीण भागातील महावितरण सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे . तालुक्यातील अनेक दुर्गम भागांतून दिघी तसेच वाकलघर येथील कार्यालयात वीज बिल कमी करण्यास आलेल्या ग्राहकाला अधिकारी न भेटल्याने नाराज होत परतावे लागते . श्रीवर्धन तालुक्यातील पाच ठिकाणी प्रमुख गावांमध्ये दुय्यम अभियंता कार्यालय आहेत . मात्र , वाढत्या वीजग्राहकांच्या समस्येमुळे व तालुक्यातील ५ विभागीय कार्यालय पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचारी व अधिकारी यांच्यावरील ताण वाढू लागला आहे . त्यामुळे महावितरणने पदे भरून सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे . स्थानिक कार्यालयात अधिकारी नसल्याने ग्राहक श्रीवर्धन कार्यालयात येत असतात ; मात्र , येथील उपलब्ध कर्मचारी व अधिकारी यांची संख्या कमी आहे . त्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या ग्राहकांची रांग वाढत असते . रांगेत उभ्या असलेल्या बहुतांशी व्यक्तींच्या तक्रारी वाढीव बिलासंदर्भात असतात . तर काहीजण बंद झालेल्या मीटरच्या तक्रारी घेऊन येतात . दर महिन्याला वीजबिल येत नाही , तर कार्यालयात घेऊन जावे , असे सांगण्यात येते . वाढीव बिलाबाबत श्रीवर्धन ये-जा होत असल्याने वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . वाकलघर कार्यालयाला कुलूप तालुक्यातील वाकलघर येथील दुय्यम अभियंता कार्यालय नेहमीच बंद असते . या कार्यालयासंबंधित बोर्ला , वावेपंचतंन , धनगरमलई , देवखोल , नागलोली , नागलोली मधलीवाडी , खुजारे , दांगुरी , कार्ले या गावांसह इतर वाड्या मिळून सोळा गावांचा समावेश आहे . वाकळघर परिसरातील ग्राहकांना बिलासंबंधीच्या तक्रारींसाठी श्रीवर्धन येथे जावे लागते . सध्या या परिसरासाठी जाधव यांच्याकडे अतिरिक्त भार आहे मात्र , तेही गांभीर्याने घेत नाही . सध्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर , श्रीवर्धन ग्रामीण , दिघी , वाकलघर , दिवेआगर व उपविभागीय मुख्य कार्यालयीन दोन अशा सात ठिकाणी कनिष्ठ अभियंता पदे रिक्त आहेत . वीज बिल कमी करण्यासंदर्भात वीस ते तीस किमी अंतरावरून श्रीवर्धन येथे जावे लागते , वाकलघर येथे महावितरणचे कार्यालय असूनदेखील कामकाज होत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे . महावितरण कंपनीत शाखा अभियंता , लाईनमन , वायरमन , ऑपरेटर आदींसह विविध प्रकारची पदे कार्यरत आहेत . ग्राहकसेवेच्या दृष्टीने प्रामुख्याने लाईनमन , असि . लाइनमन आणि शाखा आभयता या पदाना आधक महत्त्व आहे . इतर पदेही तितकीच महत्त्वाची असली तरी या पदाचा थेट ग्राहक सेवेवर परिणाम होतो . मात्र , गेल्या काही वषात श्रावधनमध्य लाइनमन , आसस्टट लाइनमन आण शाखा अभियंता ही पदे रिक्त राहत आहेत . याकडे कंपनी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असते . मोठ्या संख्येने पद रिक्त असल्यान ग्राहक पदे रिक्त असल्याने ग्राहक सेवेचा बोजवारा उडत आहे .
'साहेबांना भेटा '
महावितरण कार्यालय तक्रार घेऊन जाणाऱ्या ग्राहकाच्या समस्येचे निवारण होत नाही . वीज बिलावर संबंधित मीटरचा फोटो असणे गरजेचे आहे . मात्र , अनेक बिलावर फोटोच नसतात . फोटो असले तरी सुस्पष्ट नसतात , अनेक ग्राहकांना बिल येतच नाही . याविषयी चौकशी केल्यास , मंडळाकडे आपली रक्कम अधिकची आल्याने बिल पाठविले असल्याचे सांगतात . अनेक ग्राहकांना मजुरीचे काम सोडून या कार्यालयात चकरा माराव्या लागतात . कर्मचाऱ्यांना विचारल्यास ' साहेबांना भेटा ' असे सांगण्यात येते . विद्युत अभियंते कार्यालयात सापडतच नाही . त्यामुळे ग्राहकांना तासनतास वाट बघत बसावे लागते .
तालुक्यातील बहुतेक गावात घरातील माणसे मोलमजुरीसाठी घराबाहेर जात असल्याने कामाच्या व्यापात बिल भरण्यास वेळ लागतो . दोन दिवसांत ते भरले नाही तर डीपीसी भरावा लागत आहे . शिवाय वेळेत रीडिंग घेत नसल्याने पुढील वेळेला वाढीव बिल येईल , अशी भीती असते . महावितरण आता बिल थकले की लगेच वीजपुरवठा खंडित करते . हा नेहमीचाच प्रकार असून रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोणतेही निर्बंध अद्याप लावण्यात आले नाही . परिणामी अंदाजे रिडींग घेण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे . मात्र , ऐनवेळी अवाजवी देयक येत असल्याने ग्राहक हवालदिल झाले आहे . त्यांच्या नियमित घर खर्चावरही परिणाम होत आहे.
-श्रीधर शेलार , गाव अध्यक्ष , वाकलघर सध्या श्रीवर्धन
तालुक्यातील वाकलघर , हरिहरेश्वर , श्रीवर्धन ग्रामीण , दिघी , दिवेआगर अशा पाच ठिकाणी कनिष्ठ अभियंता व गुणवत्ता नियंत्रण इंजिनीअर तसेच कार्यालयीन इंजिनीअर रिक्त आहे . यावेळी तीन अभियंता पदे भरण्यात आली असून त्यातील दोन पदे प्रशिक्षणासाठी गेल्याने उपलब्ध अभियंत्यांकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे . उपलब्ध कर्मचारी व अधिकारी यांच्यासह सुरळीत सेवा देण्याचा प्रयत्न आहे.
- महेंद्र वाघपैंजन , उपअभियंता , श्रीवर्धन महावितरण
إرسال تعليق