रायगड जिल्ह्याचे आयुष्यमान भारत योजनेचे काम धीम्या गतीने.

रायगड जिल्ह्याचे आयुष्यमान भारत योजनेचे काम धीम्या गतीने ; आरोग्य विभागासह अन्य खात्यांची मदत घेऊन इष्टांक पूर्ण करणार

संजय खांबेटे म्हसळा प्रतिनिधी

केंद्र सरकारने आर्थीक दुर्बल कुटुंबांसाठी सुरु केलेल्या आयुष्यमान भारत योजनेसाठी राज्यात २३ सप्टेंबर २०१८पासून काम सुरु असताना राज्यातील आयुष्यमान भारत योजनेचे ३६ जिल्ह्यांतील आकडे पहाता रायगड जिह्यात लाभीर्थीचे के.वाय.सी नोंदणीचे व गोल्डन कार्ड वितरण्याचे काम फार कमी प्रमाणात झाल्याचे दिसते. आजपर्यंत ३४ % काम झाले आसल्याचे व.योग्य पाठ पुराव्याने जिल्ह्याचा इष्टांक लौकरच पूर्ण होईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यानी सांगीतले.
२०११च्या जनगणनेमधील नोंदीनुसार आयुष्यमान भारत  योजनेसाठी रायगड जिल्ह्यातीत १५ तालुक्यांतील सुमारे १ लक्ष ७ हजार ५१६ कुंटुबातील ४३ लक्ष ४ हजार १२२ लाभार्थी निवडले गेले आहेत. स्थानिक पातळीवरील C.S.C. ( Comnon Service Center's) च्या माध्यमातून
बारकोड असलेले कार्ड दिले जाणार आहे.कार्डसाठीची केवायसी प्रक्रीया पूर्ण करुन कार्ड वितरण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक माध्यमिक शाळा,आरोग्य केंद्र, उपकेंद्र , आशा, अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या माध्यमातून आयुष्मान भारत योजना
योजनेची जनजागृती व लाभार्थी जवळ संपर्क करण्यात येणार आहे .
आयुष्यमान भारत योजना लागू होण्यापुर्वीच या योजनेने जगातील सर्वात मोठे विमा कवच असल्याचा नावलौकिक मिळवला. २३ सप्टेंबर २०१८ पासुन सुरु झालेल्या या योजनेला राज्यातील शासकीय रुग्णालयात लागु करण्यात आले आहे.२०११ साली झालेल्या जनगणनेतील सर्वेक्षणातील कुटुंबांना योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा यातुन मिळणार आहे.
या योजनेमध्ये शहरी भागातील ११ वर्गातील कुटुंबाचा समावेश केला आहे. यामध्ये कचरावेचक,बांधकाम मजूर, घरकाम करणारे,फेरीवाले,भिकारी आदी वर्गातील कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे.ग्रामीण भागामध्ये घराची भौगोलिक स्थिती,कुटुंबातील कमावत्या व्यक्ती,अनुसूचित जाती व जमाती,भूमिहीन शेतकरी आदी वर्गातील कुटुंबांची निवड करण्यात आली आहे.
राज्यात खालील जिल्हयांचे काम जवळ जवळ पूर्ण झाल्याचे समजते .
"चंद्रपूर, वर्धा, गोंदीया, जालना, मुंबई,बृह. मुंबई, नांदेड, नंदूरबार, पालघर, परभणी, रत्नागिरी, सातारा, सिंधुदर्ग, वर्धा, वाशिम."


जाहिरात

"जिल्हयांतील १५ तालुक्यातील गट विकास अधिकारी, (B.D.O), तालुका आरोग्य अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, अंगणवाडी प्रकल्प अधिकारी, प्राथमिक माध्यमिक शाळा,आरोग्य केंद्र,उपकेंद्र ,आशा,अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या माध्यमातून आयुष्मान भारत योजना योजनेची जनजागृती, तसेच के.वाय.सी.चे काम संघ भाव व गतीमानतेने करण्यात येणार आहे."
डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, आलिबाग

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा