आणि...."आणखी एक द्रोणाचार्य" प्रेक्षकांच्या भेटीला


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
१९७१ साली डॉ . शंकर शेष यांनी लिहिलेलं “आणखी एक द्रोणाचार्य हे हिंदी नाटक लेखक दिग्दर्शक सुनील देव  मराठीत रुपांतरीत करून मराठी रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवविण्याचा प्रयन्त करीत आहेत. 
 नटेश्वर कलाविष्कार मुंबई आणि संकल्प प्रतिष्ठान , नांदेड  यांच्या संयुक्त विद्यामानाने सादर केलेल्या या नाटकाच्या पहिल्या प्रयोगास रसिक प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती .
 नाटकात आजच्या काळातील शिक्षकाची तुलना द्रोनाचार्याशी केली आहे .महाभारतात दिलेले संदर्भ , द्रोणाचार्य व अरविंद यांचा तुलनात्मक मांडलेले आयुष्य दाखवण्यात दिग्दर्शक ( सुनील देव ) यशस्वी ठरले आहेत. हे नाटक आपल्याला भ्रष्ट समाजाचा आरसा दाखविण्याचे काम करते. नाटकाचा दुसरा प्रयोग येत्या शुक्रवारी दिनांक १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता प्रबोधनकार ठाकरे मिनि नाट्य गृह बोरीवली येथे संपन्न होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा