संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने म्हसळे नं 1 शाळेने रॅली चे आयोजन केले होते. दरम्यान विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या घोषणा देऊन समाजामध्ये जनजागृती केली.त्याचबरोबर शाळेतील मुख्याध्यापीका श्रीम. शुभदा दातार , श्रीम. सुमित्रा खेडेकर , श्री. राजेंद्र मालूसुरे , श्रीम. कल्पना पाटील , श्रीम. वंदना खोत यानी शहरातील सर्व मार्गावर रॅली, कॉर्नर व चौकांतून जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन दिव्यांग दिन यशस्वी केला. दिव्यांगांच्या प्रति सहानुभूती नव्हे तर विश्वास दाखवा असे मत उमेश गोराडे विशेष तज्ञ गटसाधन केंद्र म्हसळा यांनी यावेळी व्यक्त केले.जागतिक दिव्यांग दिन रॅली मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील व ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथील सहा. अधीक्षक विष्णू संभारे , डॉ. स्मिता पाटील ,श्रीम वैशाली पाटील, समीक्षा मांजरेकर , वारेशी पुष्पा , शीतल लेंढे , मुकेश जंगम व सर्व स्टाफ कार्यक्रमात सहभागी झाले होते.यावेळी डायट चे विषय सहाय्यक उलडे सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.त्याचबरोबर गटसाधन केंद्रातील दीपक पाटील, संदीप भोंनकर ,सलाम कौचाली यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.अनिल बेडके यांनी पंचायत समिती च्या वतीने शाळेचे व सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
जाहिरात
"दिव्यांग व्यक्तीला कुठल्याही ठिकाणी विनाअडथळा पोहोचता यावे, यासाठी सरकारी कार्यालय, रुग्णालय, शाळा, कॉलेज, बँकांसह सार्वजनिक ठिकाणी रॅम्पची सुविधा करावी, असा अध्यादेश सन २००४मध्ये काढण्यात आला. मात्र अनेक ठिकाणी या निर्णयाची पायमल्ली होते ".
मधु गायकर , माजी सभापती पं.स. म्हसळा
"जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषदांच्या अर्थसंकल्पीय रकमेपैकी तीन टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश होते. तो आता पाच टक्के करण्यात आला आहे. अर्थसंकल्पांमध्ये तोंडदेखली तरतूद केली जात असली तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे आजवर कोणत्याही पालिका किंवा नगरपालिकांमध्ये योजना १०० टक्के पूर्ण झालेल्या नाहीत."
महादेव पाटील, तालुका प्रमुख शिवसेना.
"दिव्यांगांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत स्वतंत्र विभाग निर्माण करावा, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात पाच ते सहा टक्के लोकसंख्या दिव्यांग आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग हवा दिव्यांग कल्याण आयुक्तालय स्थापन झालेले नाही, यासाठी तालुका -जिल्हा पातळीवरून विशेष पाठपुरावा करण्यात येणार आहे."
किशोर मोहीते , दिव्यांग पालक.
"तालुक्यातीत काही कार्यालयांत रॅम्प बांधण्यात आले, मात्र अनेक ठिकाणच्या कार्यालयात निकषांचे पालन झालेलेच नाही. तालुक्यातीत प्रशासकीय कार्यालयात प्रसाधन गृहात जाण्यासाठी रॅम्प बांधण्यात आला आहे. कार्यालयांत जाण्यासाठी रॅम्प बांधलेच नाही "
बाबू शिर्के अध्यक्ष प्रेस क्लब.
إرسال تعليق