माजी मुख्यमंत्री,कोकणचे भाग्य विधाते स्व.बॅ.ए.आर.अंतुले यांचा द्वितीय स्मृतिदिन म्हसळा येथे साजरा.

फोटो . मनोगत व्यक्त करताना मुश्ताक अंतुले.

माजी मुख्यमंत्री,कोकणचे भाग्य विधाते स्व.बॅ.ए.आर.अंतुले यांचा द्वितीय स्मृतिदिन म्हसळा येथे साजरा : स्मृतिदिनी झाली राजकीय मंदीयाळी

संजय खांबेटे म्हसळा प्रतिनिधी 
माजी मुख्यमंत्री,कोकणचे भाग्य विधाते स्व.बॅ.ए.आर.अंतुले यांचा द्वितीय स्मृतिदिन म्हसळा येथील वसंतराव नाईक कला,व वाणिज्य महाविद्यालयामधे मुश्ताक अंतुले यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला, कार्यक्रमास रायगड जिल्हा कॉंग्रेस(आय) चे माजी अध्यक्ष आर.सी.घरत,रायगड जिल्हा कॉंग्रेस (आय) महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकुर,बॅ.ए.आर.अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले,संस्थेचे सचिव अशोक तळवटकर,व्यवस्थापन समिती सदस्य फझल हालदे,निलम वेटकोळीरायगड जिल्ह्या काँग्रेस चे माजी अध्यक्ष जे.टी. पाटिल, माणगाव पंचायत समिती सभापती सुजित शिंदे,नाजिम चोगले, हर्षल पाटिल, शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटिल, माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के,नासिर मिठागरे,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव भिकु पाटिल, डॉ.मुईज शेख,प्राचार्य डॉ.राघव राव,मुबशीर जमादार,सुकुमार भगत,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष समिर बनकर,डॉ.चव्हाण,फंजदार शिक्षण संस्थेचे संस्थापक अ. रऊफ फजंदार, श्रीवर्धन तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय तोडणकर,अलिबाग तालुका काँग्रेस अध्यक्ष योगेश मगर, श्रीमती उमरोठकर,दिपक खाडे, अल्ली कौचाली आदि मान्यवर तसेच अलिबाग,पनवेल,कर्जत,पेण,महाड आणि जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते,हितचिंतक व बँ. अंतुले यांचे निष्ठावंत समर्थक,विविध राजकीय मंडळींच्या उपस्थितीमुळे राजकीय मंदीयाळी झाली यावेळी अध्यक्षीय भाषणांत असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे बॅ.ए.आर.अंतुले अस म्हटल तर वावगे ठरणार नसल्याचे सांगितले.बॅ. अंतुले यांनी निस्वार्थीपणे राजकारण केलं.कोकणातील गरीबातल्या गरीब सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला तंत्र शिक्षण घेता यावे म्हणून लोणेरे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची स्थापना केली त्यावेळी त्यांनी कुटुंबातील कोणाचेही नाव या विद्यापीठाला न देता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कायम प्रत्येकाच्या मुखात रहावे यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुरु केले.बॅ. अंतुले यांची दूरदृष्टी एवढी प्रबळ होती की ग्रामिण भागातील विद्यार्थी हा पदवीधर झाला पाहिजे यासाठी म्हसळा-मुरुड सारख्या ग्रामिण भागात महाविद्यालय सुरु केले,त्यालाही स्वतःचे नाव न देता राज्याचे माजी मुखमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने महाविद्यालये सुरु केली.भारतीय जनतेसाठी त्यांनी अनेक त्याग केल्यानेच आज संपूर्ण कोकणातच नव्हे तर संपूर्ण देशात बॅ. अंतुले यांचे नाव आदराने घेतले जाते.बॅ. अंतुले यांचे विचार प्रेरणादायी असून त्यांची उंची गाठणं हे निश्चितपणे कोणालाही जमलं नाही असे मुश्ताक अंतुले यानी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्या.टेकळे यांनी केले तर प्राध्या.जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी नूतन दुर्वास वेटकोळी हिने बॅ.अंतुले यांच्या जीवनावर सुस्वर आवाजात कविता गाऊन सर्वाना मंत्रमुग्ध केले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा