म्हसळा कन्याशाळा मार्गावरील विद्युत वितरणचा वाकडा धोकादायक पोल बदलावा पालकांची मागणी


संजय खांंबेटे म्हसळा प्रतिनिधी 

म्हसळा शहरातील  कन्या शाळा परिसरातील एकता नगरच्या मार्गावरील विद्युत प्रवाह सुरु असलेला पोल ची अवस्था बिकट झाली आहे. पोल पडल्यास अगर अपघात झाल्यास कधीही दुर्घटना होण्याचा संभव आहे . पोल तात्काळ बदलावा अशी मागणी या परिसरांतील नागरीकांकडून व पालकांकडून होत आहे.शहरातील रा.जी.प ची कन्याशाळा, कुडेकर स्कुल येथे जाण्यासाठी लहान विद्यार्थीची लगबग व गर्दी असते, याच रस्त्यावर पुरवठा विभागाचे म्हसळा तालुका शासकीय गोडाऊन आसल्याने त्या रस्त्यावरून २५ ते ३० टनी गाडयांची वर्दळ असते, पोलच्या समोरच दुय्यम निबंधक कार्यालयात देखील खरेदी विक्री साठी मोठी गर्दी असते. यामुळे धोकादायक खांब त्वरीत बदलण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. म्हसळा नगरपंचायत हद्दीत अनेक वीज खांब गंजले असून गंजलेल्या खांब बदलण्यात यावे अशी मागणी होतआहे.

"कन्या शाळा परिसरातील एकता नगरच्या मार्गावरील विद्युत प्रवाह सुरु असलेला पोलची दुरावस्था आहे, या बाबतची चर्चा शिक्षक पालक बैठकीत होत असते. लौकरात लौकर पोल बदलून मिळावा, तसेच शहरांतील शाळा , अंगणवाडी परिसरांतील  अगर ग्राऊंड मधील विजेच्या पोलना नगरपंचायत अगर म.रा. वि.वि. कंपनीने फ्लॅस्टीक ने रॅपींग करून शॉकप्रूफ करावे"
संतोष उध्दरकर, पालक

"धोकादायक पोल बदलण्याची प्रक्रिया सुरु आहे. खड्डा खणलेला आहेरस्त्यावर असणारी वाहतुकीच्या दृष्टीने खड्डा खोल करण्यासाठी मशीन (ब्रेकर) ची आवश्यकता आहे, ब्रेकर उपलब्ध झाल्यावर तात्काळ काम करण्यात येईल "
धिरज बिराजदार ,अभियंता म.रा. वि.वि.कंपनी.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा