● आघाडीच्या उमेदवार आदिती तटकरे यांना विश्वास
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस च्या श्रीवर्धन विधानसभेच्या उमेदवार यांनी थेट मतदार संपर्क गाठण्यांवर अधिक भर देऊन तालुक्यातील मेंदडी गणातील मेंदडी,वरवठणे गणातील केलटे, आणि आंबेत गणातील खामगाव येथे भेटी देऊन मतदारांशी संपर्क साधला.
यावेळी तालुका अध्यक्ष समिर बनकर,सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदिप चाचले,जमिर नजिर,लक्ष्मण भाये, परशुराम मांदाडकर,महिला अध्यक्षा रेशमा कानसे,अनिल बसवत,शे.का.प.चिटणीस संतोष पाटिल, लहूशेठ म्हात्रे, माजी सभापती उज्वला सावंत, संतोष (नाना) सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना उमेदवार आदिती तटकरे यांनी सांगितले की विरोधकांनी केवळ जातीपातीचे राजकारण करून लोकांचा विश्वासघात केलाच, शिवाय गावागावात वाद, कलह निर्माण केला. जेव्हापासून सुनिल तटकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे जबाबदारी सांभाळली तेव्हापासून खऱ्या अर्थाने श्रीवर्धन मतदार संघात विकास पर्व सुरु झाले आणि खास. सुनिल तटकरे यांनीच या मतदार संघाचा परिपूर्ण विकास केल्याचे सांगून खास.सुनिल तटकरे यांचे हात बळकट करण्यासाठी मला मतदान करण्याचे आवाहान आदिती तटकरे यांनी केले.

إرسال تعليق