आदर्श मराठी शाळा खरसई येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
2ऑक्टो रोजी खरसई शाळेत महात्मा गांधी लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून गावात स्वच्छता प्लास्टिक बंदी व प्लास्टिकचे कचरा गोळा करून विल्हेवाट लाऊन गावातील ग्रामस्थांना जनजाग्रुती म्हणून गावातून रँली काढण्यात आली. प्रभातफेरी काढून स्वच्छतेची व प्लास्टिक बंदीची शपथ घेण्यात आली. गावातील आपल्या व्यवसायात यश मिळवलेले डॉ.किशोर कोकाटे व अँडकेट अरुणा मांदाडकर कोकाटे यांचा
विध्यार्थ्यांशी व्यावसासंबंधी मार्गदर्शनपर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. प्लास्टिकचे वापर करणार नाही अशी शपथ ग्रामस्थ पालक,विद्यार्थी,ग्रामपंचातीचे सदस्य यांनी शपथ
घेतली .यावेळी गावचे सरपंच इम्रान आकलेकर, जगदीश खोत, बिना कातळकर,जयश्री मांदारे, ग्रामप्रवर्तक अमोल पाटील, शाळेचे मुख्याध्यापक दिनेश रांगळे. सानप सर मडावी सर राठोड सर,कोळसे मँडम,शेबाळे सर व विध्यार्थी विध्यर्थिनी उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन कमेटी अध्यक्ष श्री निलेश मांदाडकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

إرسال تعليق