अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते अटल टिकरिंग लॅब व स्मार्ट डिजिटल क्लासरूम चे उद्घाटन



● प्रा.बी.एन.माळी यांचा सेवानिवृत्त सन्मान सत्कार सोहळा संपन्न

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

           श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज म्हसळा चे प्राचार्य बाळासाहेब माळी यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचे औचित्य साधून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर चे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते विद्यालयातील अटल टिकरिंग लॅब आणि स्मार्ट डिजिटल क्लासरूम चे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी श्रीराम साळुंखे, संस्था व्यवस्थापक मंडळ सदस्य प्राचार्य एस.के.कुंभार, रायगड विभाग प्रमुख प्राचार्य भाऊसाहेब सांगळे,संजय महाजन,एस.एच.पाटिल,स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन समिर बनकर,समाजसेवक प्रदिप कदम, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,महेंद्र करडे,रेणुका पाटिल, सुनिल उमरोठकर,कमळाकर करडे,प्रविण बनकर,सुरेश जैन,मुस्लिम समाज अध्यक्ष अहमद अली पेनकर,संतोष जाधव,नितीन बोरकर,अनिल बसवत,गोपाळ भायदे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगतात अभयकुमार साळुंखे यांनी प्राचार्य बाळासाहेब माळी यांच्या कार्याचा गौरव करून बाळासाहेब माळी यांनी तन-मन एकाग्र ठेऊन या शाखेवर अगदी मुलासारखं प्रेम करून या शाखेला जिल्ह्यात एका उंच ठिकाणी नेऊन ठेवल्यामुळेच म्हसळ्यातील शाखा संस्थेच्या कायम स्मरणात राहील असे वैभव त्यांनी प्राप्त करून दिले असल्याचा रास्त अभिमान तुम्हा-आम्हा सर्वानाच असल्याचे सांगितले.त्यांनी पुढे सांगितले की शिक्षण महर्षी प.पू.बापूजी साळुंखे हे स्वातंत्र सैनिक होते,त्यांनी स्वामी विवेकनंदाच्या नावाने हे एक रोपटं लावलं.त्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले असून त्याच्या फांदया संपूर्ण राज्यात पसरल्या आहेत. बापूजी शहरात शाखा सुरु करू शकले असते परंतु खेडापाड्यातील गोरगरीब शेतकऱ्याचं मूल, खेड्यातील आदिवासी,दलित,सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला शिक्षण घेता यावं हा एकमेव आणि मुख्य उद्देश बापूंजींचा होता त्यामुळेच त्यांनी ग्रामीण भागात विद्यामंदिर सुरु करुन सर्वसामान्यांना न्याय दिला असे अभयकुमार साळुंखे यांनी आवर्जून सांगितले. शिक्षकांनी विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्याना प्रामाणिक पणे ज्ञान देऊन विद्यार्थ्यामध्ये असणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या राक्षसाचा बिमोड करून सुसंस्कृत आणि ज्ञानी विध्यार्थी घडविण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य बी.एन.माळी यांनी सर्वांचे आभार मानून ग्रामस्थानच्या सहकार्यामुळेच मी या शाखेवर चांगले आणि यशस्वी होऊ शकलो याचा मला रास्त अभिमान असल्याचे बाळासाहेब माळी यांनी सांगितले.संस्था हे एक उत्तम कुटूंब असून विद्यार्थ्यानी या संस्थेवर प्रेम केलं पाहिजे,थोर मोठ्याचा आदर राखलं पाहिजे असा उपदेश माळी यांनी केला. संस्थेच्या 35 वर्षे,2 महिने आणि 17 दिवसाच्या प्रदीर्घ सेवेत प्रत्येकाला विश्वासात घेऊनच या शिक्षणाचा गाडा सदैव पुढे चालत ठेवल्यामुळेच मी यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील जेष्ठ शिक्षक मंगेश कदम यांनी करताना बाळासाहेब माळी यांच्या यशस्वी जीवनाच्या चढत्या आलेखाचा खास उल्लेख केला.गायकवाड सर आणि गांजरे सर यांनी सूत्रसंचालद्वारे कार्यक्रमाची शोभा वाढविली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा