संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
किल्ले बनविणे ही आपल्या महाराष्ट्राची परंपराआहे. महाराष्ट्रात किल्ल्यांना एक आगळे-वेगळे स्थान आहे. हे ऐतिहासिक किल्ले त्या काळातील राजे-महाराजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात. इतिहासकालीन पराक्रम आणि संघर्षाचे हे गड-किल्ले प्रतीक आहेत. ही परंपरा वाढविण्या साठी म्हसळ्यात गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला शहरातून उत्तम प्रतिसाद मिळाला पुढिल वर्षी प्रतिष्ठान तालुका पातळीवर स्पर्धा आयोजित करणार असल्याचे मानस गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवचरित्र व्याख्याते सचिन करडे यानी सांगितले. शहरांतील या स्पर्धेत प्रथम क्रमांक: (विभागून) कु़. अनिरुद्ध सं.कुडेकर (चंदनवंदन), आणि कु. यश महेंद्र म्हशिलकर व कु. सागर सिताराम धुमाल (विजयदुर्ग)तृतीय क्रमांक (विभागून): कु. सोहम भालचंद्र करडे, कु. आर्य महेंद्र करडे व आदित्य प्रशांत करडे (प्रतापगड) आणि कु. कार्तिक बनारसी धिमर व कु. अमित दुर्गाप्रसाद धिमर (जंजिरा),द्वितीय क्रमांक (विभागून): कु.ओमकार ज.गोविलकर, कु.करण मंगेश घाँसी व कु. संजु भोपाराम कुंभार (संतोषगड) आणि कु.दिपेश दिनेश म्हशिल कर व अथर्व महेश म्हशिलकर (उंदेरी) चतुर्थ क्रमांक कु. दत्तात्रेय सुशिल म्हशिलकर (लोहगड) आणि कु. अक्षरा निलेश परबळकर (रायगड),पाचवा क्रमांक :कुओम जितेंद्र पाभरेकर (रायगड) तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक: कु.श्रवण जितेंद्र म्हशिलकर व कु.आर्यन जितेंद्र म्हशिलकर यांनी पटकावला.
"शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास,गड-किल्ले रूपी समजावा आणि त्यातून बाल आणि तरुणांना प्रेरणा मिळावी हा या स्पर्धांमागील उद्देश आहे, पुढील वर्षी या स्पर्धचे स्वरूप वाढविण्यात येणार आहे "
सचिन करडे,शिवचरित्र व्याख्याते
"शिवाजी महाराजांचा इतिहास आज जरी बरीचशी तरुण पिढी विसरत चालली असली तरी आजची बच्चे कंपनी मात्र महाराष्ट्राचा मराठमोळा इतिहास व संस्कृतीची आठवण दिवाळीत किल्ल्यांच्या स्वरूपात ताजी करतात व समाजाला आदर्श देत असतात."
सौ. श्रेया वडके-करडे, गड किल्ले अभ्यासक,
या वर्षी बाल वाचकांची गड किल्लाचे पुस्तकाना व चित्राना वाचकांची प्रचंड मागणी होती दिवाळीपूर्वीच बालवाचकानी दुर्गाच्या देशात, महाराष्ट्रांतील गड किल्ले , शिवचरित्र आदी पुस्तकाना मागणी केली, आशा पध्दतीच्या आयोजनामुळे विद्यार्थ्याना वाचनाची नक्कीच गोडी लागेल. पुढील वर्षी दुर्गाचे फोटो उपलब्ध करणार आहोत."
धनश्री नाक्ती , प्र. ग्रंथपाल
إرسال تعليق