मुंबई गोवा महामार्ग गेला खड्ड्यात : प्रवाशी व वाहन चालक त्रस्त...


श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

महाराष्ट्रातील सगळ्यात महत्वाचा राष्ट्रीय  महामार्ग असलेले गोवा मुंबई आजमितीस खड्ड्यात गेला आहे .रस्त्याची सर्वत्र चाळण झाली असून वाहन चालक यांना वाहन चालवंतांना मोठी कसरत करावी लागते . रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही .खड्डेमय रस्त्यामुळे वाहतुक कोंडी व अपघातास चालना मिळत आहे .परिणामी जनतेचे हाल होत आहेत .
कोकणाला मुंबईशी जोडणारा महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग  मुबंई गोवा आहे .आज सदरच्या महामार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे .मात्र त्या विषयी पक्षीय अवाक्षर काढले जात नाही ही मोठी शोकांतिका आहे .पोलादपूर , महाड , माणगाव , इंदापूर , कोलाड , नागोठणे , वडखळ , पेण ते पनवेल सर्व रस्ता वाहतुकीस योग्य राहिलेला नाही .माणगाव ते वडखळ मार्गावर रस्त्याची अवस्था बिकट झाली असून हा महामार्ग आहे का  ? या विषयी जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .माणगाव सोडल्या नंतर पुढे प्रवास करताना वाहन चालकांना वाहने चालवणे मुश्कील नव्हे तर अशक्य झाले आहे .कोलाड पुलाची अवस्था गँभिर झाली असून त्या वरून वाहन चालवणे धोक्याचे झाले आहे .नागोठणे ते वडखळ अवजड वाहतुक नियमित निदर्शनांस येते .त्या मुळे वाहतुक कोंडी ही सदैव जनतेच्या वाट्याला येत आहे .नागोठणे व वडखळ च्या हद्दीत विविध कंपनी चालू आहेत .त्या कारणे वाहनांची संख्या जास्त प्रमाणात दिसून येते .वडखळ ते पेण प्रवास हे दिव्य मानले जाते .पेण ते वडखळ अवघे 6 किमीचे अंतर नसताना कधी कधी 1एक तासापेक्षा जास्त वेळ प्रवासाला लागत असल्याचे दिसून येते .मुंबई गोवा महामार्गाचे काम चालू आहे मात्र माणगाव ते पेण रस्ता आजमितीस वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत आहे .रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडल्याने त्याचा परिणाम पर्यटन , दळणवळण व सण उत्सव या सर्व बाबीवर होत आहे .कोकणातील  श्रीवर्धन , दिवेआगार , हरिहरेश्वर , गणपतीपुळे ,महाड ही पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गावे आहेत .रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या मुळे पर्यटकांची संख्या कमी होत आहे .कारण मुबंई ते माणगाव 150 किमीचे अंतर आहे .परंतु त्या साठी वेळ प्रसंगी 4 ते पाच तासांचा कालावधी लागतो आहे .परिणामी पर्यटक कोकणच्या ऐवजी प्रवास सुखकारक ठरेल अशा ठिकाणाला प्राधान्य देत आहेत .या दिवाळी सणाला कोकणात घरी आलेल्या सर्व लोकांना रस्त्याच्या दुर्दशेचा त्रास सहन करावा लागला आहे .भाऊबीजेच्या दिवशी कोलाड ते वडखळ रस्त्यावर वाहतुक कोंडी झाल्याने रस्त्यावर सर्वत्र लांब लचक वाहनांची गर्दी झालेली दिसून आली .महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईल तेव्हा जाईल परंतु आजमितीस कमीत कमी रस्त्यावरील खड्ड्यांची तात्पुरती तरी डागडुजी करावी व सामान्य व्यक्तीस प्रवास करता येईल असा रस्ता तयार करावा अशी मागणी जनता करत आहे .
माणगाव ते वडखळ रस्त्याच्या दुरावस्थे बद्दल संबधित सरकारी अभियंता पी .डी .फेगाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्याच्या कडून कोणतीच प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही .



 नागठणे ते वडखळ  प्रवास नकोसा वाटत आहे .रस्त्याची परिस्थिती अतिशय भयंकर झाली आहे .कॉलेज जातांना दररोज जास्त वेळ जातो  .जनतेच्या प्रतिनिधी नी एकदा तरी सार्वजनिक वाहनातून पेण , वडखळ ते नागोठणे प्रवास केल्यास त्यांना रस्त्यांची दुर्दशा समजेल .....पायल नाईक (विद्यर्थिनी विधी विद्यालय अलिबाग )


अलिबाग ला जातांना माणगाव ते वडखळ रस्त्यावर वाहन चालवणे अतिशय कठीण झाले आहे .रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठं मोठे खड्डे पडले आहेत .वाहन चालवताना कोणता खड्डा चुकवायचा हा प्रश्न पडतो .कोणत्याही खड्ड्यात गाडी गेली तरी त्रास हा होतोच .खड्ड्याचा परिणाम वाहनांच्या देखभाली वर होत आहे .....हेमंत चांदेकर ( व्यावसायिक महाड  )


माणगाव ते पनवेल हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही त्या कारणे आपण संबधित खात्याशी संपर्क साधावा ...सचिन निफाडे ( महाराष्ट्र राज्य महामार्ग अभियंता )

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा