प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयात आज सरदार वल्लभभाई पटेल यांची १४४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन आजीव सदस्य व वाचक व्ही. सी. सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४४ वी जयंती. गांधीजींचे कट्टर अनुयायी, संघटनेवर पकड असणारा ‘लोहपुरुष’, पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान आणि ‘भारतीय एकतेचे प्रतीक’ अशा असंख्य बिरुदावलींनी जनमानसात त्यांची आठवण काढली जाते अशा या थोर पुरुषाचे प्रतिमेचे पूजन करण्याचे भाग्य संस्थेच्या वतीने मला मिळाले, सातत्याने माझ्या व आमचे संस्थेच्या हातून सकारात्मक व संघटनात्मक कार्य घडावे असे सोनावणे यानी सांगितले. यावेळी सा. वा. म्हसळे अध्यक्ष श्री. संजय के. खांबेटे, बाल विकास प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे, दिपाली पालवे, वैष्णवी कलबासकर, वाचनालयाचे प्र .ग्रंथपाल धनश्री नाक्ती ,बी.पी.कदम,जी.जी.पारावे, दामोदर गुरव, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
إرسال تعليق