● एकूण 49703 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
राज्यात 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक संपन्न होणार असून 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी मतदारसंघातील म्हसळा तालुक्याची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
तालुक्यातील 23798 पुरुष आणि 25905 स्त्रिया असे एकूण 49703 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुक्यात एकूण 70 मतदान केंद्र असून या सर्व 70 केंद्रावर बीएलओ यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर 11 क्षेत्रीय अधिकारी आहेत. त्यांच्या दिमतीला भरारी पथक, स्थिर सर्व्हेक्षण पथक, व्हिडीओ सर्व्हेक्षण पथक, व्हिडीओ पाहणी पथक तयार आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्री.अमित शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तहसीलदार शरद गोसावी, तसेच निवडणूक नायब तहसीलदार एन.एल.मोरे हे सर्व निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

إرسال تعليق