म्हसळयात "सही पोषण देश रोशन" अस्तीत्वात येणार का?



म्हसळा तालुक्यात तब्बल दोन महीने शालेय पोषण आहार आलाच नाही.
गट विकास आधिकाऱ्यांचे शिक्षण विभागावर नियंत्रण नाही .

संजय खांबेटे : म्हसळा 
केंद्रात व राज्यात सही पोषण देश रोशन’, प्रत्येक घर पोषण उत्सव कार्यक्रम सुरू असताना म्हसळा तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महीन्याचा पोषण आहार आलाच नाही असे पुढे आले आहे.केंद्र सरकारने शालेय पोषण आहार देण्याबरोबर पूरक आहार देण्याचे आदेश दिले आसताना म्हसळा तालुक्यात पूरक आहार सोडाच, ऑगस्ट व सप्टेंबरचा शालेय पोषण आहार मिळालाच नसल्याचे समजते.तालुका पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजात आपल्या तालुक्यात शालेय पोषण आहाराचे वितरण ,दर्जा व वाटपा बाबतचा निकष तपासून मार्गदर्शन करायचे या महत्वाच्या प्रशासकीय कामकाजाकडे गटविकास आधिका ऱ्यांचे नकळत दुर्लक्ष होते.
आठवड्यातील तीन दिवस वेगवेगळे पदार्थ द्यावेत. सदरचा अतीरिक्त पूरक आहार 31 ऑक्टोबर 2019 अखेर पर्यंत देण्यात यावा. सदरचा पूरक आहार शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, प्रतिनिधी, पालक यांच्या उपस्थितीत द्यावा. शाळा स्तरावर विहीत नमुन्यामध्ये नोंदी कराव्यात, मुख्याध्यापक व उपस्थित प्रतिनिधी/पालक यांनी स्वाक्षरी करावी.
शाळांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार देताना शासनाच्या निर्देशाप्रमाणे आठवड्यातून एक दिवस आहारामध्ये तूर डाळीचा समावेश करावयाचा आहे.  या शैक्षणिक वर्षात पुढील प्रमाण शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहे, इयत्ता पहिली ते पाचवीकरिता व राष्ट्रीय मध्यान्न भोजन योजना अंतर्गत सहावी ते आठवी करिता प्रमाण प्रति विद्यार्थी तांदूळ 100/150 ग्रॅम, डाळी 20 / 30 गॅम, जिरे व मोहरी – 0.20 / 0.30 ग्रॅम, हळद – 0.50 / 0.75 ग्रॅम, मसाला – 1.25 / 2.25 ग्रॅम, डबल फोर्ट़ङ्गाईड मीठ – 2.40 / 3.40 ग्रॅम, फोर्टङ्गाइड तेल – 5 / 7.5 ग्रॅम. उपलब्ध करून देण्यात आले आहे. याप्रमाणे शाळांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षात घेऊन आहार शिजवून देणे अपेक्षित आहे. शासन शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नवनवीन घोषणा करत आहे. यातच विद्यार्थी कुपोषण मुक्त होवून शाळेत दररोज यावेत यासाठी शालेय पोषण आहार योजना चालू केली. यात एकही दिवस खंड पडू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत.महिन्याच्या सुरुवातीला ठेकेदाराने धान्य व धान्यादी माल शाळांवर पोहोच करणे अपेक्षित आहे परंतु दरमहा धान्य उशिरा येते. म्हसळा तालुक्यात माहे आँगस्ट व सप्टेंबर महीन्याचा शालेय पोषण आहार अद्यापही आलेला नाही. मग शाळा कोठून शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देतात कि देतच नाही असा प्रश्न पडला आहे. ठेकेदाराचे कोणाशी साटेलोटे आहे काही समजत नाही.कधी आले तरी त्याचे वजन, दर्जा हा तालुक्यात तपासून नंतर शाळांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे.परंतु यावर अधिकारी वर्गाचे नियंत्रण नाही. या बाबत प्रभारी गट शिक्षण अधिकारी याना शालेय पोषण आहारा बाबत माहीती विचारली असता
"शालेय पोषण आहारा विषयी माहीती साळुंखे सरांकडे असते त्याना विचारून घ्या." असे बेजबाबदार उत्तर दिले.

शालेय पोषण आहाराचा व पूरक पौष्टीक आहाराचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी मुदतीत मागणी देत असतो, पालक व शाळा व्यवस्थापन समित्यांनी जागरुकपणे व शक्य तेवढा लोकसहभाग देऊन शालेय पोषण आहार योजनेची अमलबजावणी दर्जेदारपणे करावी.
गजानन सांळुखे, (प्र) शा. पो. आहारअधिक्षक .पंचायत समीती म्हसळा,
" जून -जुलै चे धान्य आले, ऑगस्ट संप्टेंबरचे धाग्य अद्याप आले नाही. शालेय पोषण आहारापासून बालकाना वंचीत ठेऊ नये असे न्यायालयाचे आदेश आहेत. धान्य येत नसेल त्या वेळी तालुका प्रशासनाने व्यवस्था करणे आवश्यक आहे.
सुनील पवार, केंद्र प्रमुख ,केलटे
फोटो : ( संग्रहीत )
चालू शैक्षणिक वर्षांत एकदाच जून- जुलै महीन्याचे धान्य आले तेच धान्य आम्ही वापरत आहोत. ऑगस्ट संप्टेबरचे धान्य अद्याप आले नाही.
अनिल ठाकूर , केंद्रप्रमुख , म्हसळा

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा