● धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य सदैव स्मरणात राहणारे - प्रांताधिकारी प्रविण पवार
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म ही शिकवण देऊन असंख्य लोकांना उत्तम शिकवण देऊन अनेक उध्वस्त होणारी कुटुंबे सुखी करण्याचे काम थोर समाजसुधारक महाराष्ट्र भुषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांनी केले आहे. त्यांचे हे अध्यात्मिक कार्य डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांनी निरंतर सुरू ठेवले आहे. आध्यत्मिक कार्य करीत असतानाच सामाजिक व लोकोपयोगी कामे करण्यावर देखील डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून भर दिला जात आहे. जनसेवेचा व्रत स्वीकारलेल्या या प्रतिष्ठानच्या माध्यमातून म्हसळा तालुक्यात दि.09 सप्टेंबर रोजी कन्याशाला येथे नागरिकांना दैनंदिन कामकाजात शासकीय स्तरावर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे विविध शासकीय दाखले वाटप कार्यक्रम श्रीवर्धन प्रांताधिकारी श्री.प्रविण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी प्रांताधिकारी प्रविण पवार यांनी मार्गदर्शन करताना डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून ते सदैव स्मरणात राहणारे आहे असे गौरवोद्गार काढून नागरिकांनी प्रतिष्ठान च्या सामाजिक कार्याचा लाभ घेतला पाहिजे असे आव्हाहन केले. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मेहता यांनी मनोगत व्यक्त करताना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी आरोग्य शिबीर घेतले पाहिजेत असे सांगून प्रतिष्ठानच्या कोणत्याही कार्यात वैद्यकीय विभागाचा संपूर्ण सहकार्य राहील तसेंच व्यक्तिशः आपण स्वतः प्रतिष्ठानच्या कार्यात सर्वोतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
मागील काही काही वर्षात म्हसळा तालुक्यात दोन पाणपोई, अनेक गावांमध्ये बस थांबे, पाझर तलावातील गाळ उपसा, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, तसेच 2500 पेक्षा विविध जाती धर्माचे जातीचे दाखले वाटप, ग्रामीण भागासह शहरात स्वच्छता मोहीम, असे विविध उपक्रम राबवत तालुक्यात प्रतिष्ठानने महान कार्य केले आहे त्यामुळे या शासकीय दाखले वाटप उपक्रमामुळे तालुक्यात डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्व स्थरातून विशेष कौतुक होत आहे.
तालुक्यातील नागरिकांचे 2500 पेक्षा जास्त दाखल्यांचे प्रस्ताव तयार केले असून त्यापैकी काही वय, अधिवास, दाखले मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रांताधिकारी प्रविण पवार, म्हसळा नायब तहसिलदार के.टी.भिंगारे, मंडळ अधिकारी श्री.करचे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मेहता, तालुका कृषी अधिकारी श्री.साळी, पंचायत समिती अधिकारी श्री.बाक्कर, श्री.परकाळे यांसह असंख्य श्री सदस्य उपस्थित होते.
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कोणत्याही प्रकारची जात पात भेदभाव मानत नाहीत हे आम्हाला दाखले वाटप कार्यक्रम मुले समजून आले. आमच्या मुस्लिम समाजातील लोकांचे शासकीय दाखले प्रातिष्ठानच्या स्वखर्चातून विनाशुल्क देऊन प्रतिष्ठानने समाजासमोर एक नवीन आदर्श घालून दिला.
लाभार्थी मुस्लिम समाज बांधव.

إرسال تعليق