संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यांतील अलिबाग, पेण, रोहा, खालापूर (चौक), मुरुड ,महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, तळा, पाली या तालुक्यातून होमगार्ड पथकांत भरती प्रक्रीया दिनांक 01/09/2019 ते दिनांक 10/09/2019 या कालावधीत सुरु आहे. तरी आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त उमेदवारानी भाग ध्यावा असे आवाहन म्हसळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यानी पोलीस पाटील तटरक्षक दल सभेत आवाहन केले.https://dnyanjyotisatara. in/hgmaha/login1.php
या संकेत स्थळावर जाऊन HGs ENROLLMENT मधील ONLINE ENROLLMENT FORM मध्ये ऑन लाईन फॉर्म भरावे. Print Registrtion जाऊन फॉर्मची प्रिंट काढून, सदरची प्रिंट मूळ कागदपत्रासह व त्यांच्या छायांकित प्रतिसह रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय अलीबाग येथे कवायत मैदानावर खालील तारखेस उपस्थित राहावे.दिनांक 16/09/2019 अलिबाग, पेण, रोहा, खालापूर (चौक), मुरुड तालुक्यातील उमेदवार व दिनांक 17/09/2019 महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, तळा, पाली तालुक्यातील उमेदवारानी सदर तारखांस वरील इच्छुक उमेदवारांनी सकाळी 07.00 ते 11.00 या वेळेत उपस्थित राहावे असे सांगण्यात आले.
होमगार्ड नोंदणी करीता पात्रतेचे निकष
शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण,वयोमर्यादा 20 ते 50 वर्ष ( दिनांक 01/09/2019)उंची पुरुषांकरिता 162 से.मी. व महिलाकरिता 150 से.मी.छाती पुरूषांकरिता 76 से.मी. व फुगवून 81. से.मी. (छाती 5 से.मी. फुगवता येणे आवश्यक आहे.),खेळाडू, आय.टी.आय, जडवाहन परवानाधारक, एन.सी.सी., बी व सी प्रमाणपत्र धारक, माजी सैनिक, नागरी संरक्षण सेवेत असलेले परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक यांना तांत्रिक अहर्ता गुण दिले जातील
नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रे
रहिवासी पुरावा ( आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र), वय शाळा सोडल्याचा दाखला, 10 वी किवा 12 वी बोर्ड प्रमाणपत्र,तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र.नुकतेच काढलेले पासपोर्ट साईज दोन फोटो.
" शहरांतून अनेक ठीकाणी "गावाकडे चला" यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसीध्दी अगर कार्यशाळा घेतल्या जातात . होमगार्ड ही सेवा सेवाभावी आहेच पण गावातील तालुक्यात मिळणार आहे. त्यामुळे या सेवेतून "गावातच रहा" हा ऊद्देश साध्य होणार आहे.
परशुराम कांबळे , पोलीस निरीक्षक, म्हसळा


إرسال تعليق